Lokmat Sakhi >Fitness > ना डिहायड्रेशनचा त्रास ना उन्हाळी लागण्याचा, व्यायाम करायचा तर उन्हाळ्यात 'या' वेळी चालणंच अधिक सुरक्षित

ना डिहायड्रेशनचा त्रास ना उन्हाळी लागण्याचा, व्यायाम करायचा तर उन्हाळ्यात 'या' वेळी चालणंच अधिक सुरक्षित

Summer Walking Tips : जर चुकीच्या वेळी पायी चालाल तर तुम्हाला फायद्यांऐवजी नुकसानच होऊ शकतं. अशात उन्हाळ्यात कोणत्या वेळी पायी चालणं अधिक फायदेशीर ठरेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:51 IST2025-04-24T14:35:40+5:302025-04-24T16:51:17+5:30

Summer Walking Tips : जर चुकीच्या वेळी पायी चालाल तर तुम्हाला फायद्यांऐवजी नुकसानच होऊ शकतं. अशात उन्हाळ्यात कोणत्या वेळी पायी चालणं अधिक फायदेशीर ठरेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Summer Walking Tips : What is best time for walk in summer | ना डिहायड्रेशनचा त्रास ना उन्हाळी लागण्याचा, व्यायाम करायचा तर उन्हाळ्यात 'या' वेळी चालणंच अधिक सुरक्षित

ना डिहायड्रेशनचा त्रास ना उन्हाळी लागण्याचा, व्यायाम करायचा तर उन्हाळ्यात 'या' वेळी चालणंच अधिक सुरक्षित

Summer Walking Tips  : पायी चालण्याचे आरोग्याला किती फायदे मिळतात हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. पण पायी चालण्याचे काही नियम पाळणंही तेवढंच महत्वाचं आहे. बरेच लोक सकाळी आणि सायंकाळी पायी चालायला जातात. पण उन्हाळ्यात पायी चालण्यासाठी जास्त नियम पाळण्याची गरज पडते. उन्हाळ्यात पायी चालण्यासाठी वेळही महत्वाची ठरते. जर चुकीच्या वेळी पायी चालाल तर तुम्हाला फायद्यांऐवजी नुकसानच होऊ शकतं. अशात उन्हाळ्यात कोणत्या वेळी पायी चालणं अधिक फायदेशीर ठरेल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उन्हाळ्यात पायी चालण्याची योग्य वेळ

एप्रिल आणि मे महिन्यात उकाडा जास्त राहतो. इतका की, 10 किंवा 11 वाजताही घराबाहेर पडणं अवघड होतं. हवाही गरम असते. त्यामुळे दुपारी पायी चालणं शक्य नसतं. त्याऐवजी सकाळी झोपेतून लवकर उठून पायी चालायला हवं. सकाळी वॉक करण्यासाठी 5.30 ते 7.30 वाजताची वेळ योग्य राहते. यावेळी वातावरण जास्त उष्णही नसतं. तसेच सकाळी प्रदूषणही कमी राहतं. त्यामुळे श्वास घेण्यास समस्या होणार नाही. सोबतच हवाही गरम राहत नाही.

सायंकाळी कधी चालाल?

जर सकाळी तुम्ही पायी चालायला जाऊ शकत नसाल तर सायंकाळी जाऊ शकता. पण कधी चालाल? तर उन्हाळ्यात सायंकाळी 6 वाजतानंतर तुम्हीही कधीही पायी चालू शकता. कारण याआधी सुद्धा उन्ह असतं किंवा गरम हवा असते. त्यामुळे 6 किंवा 7 किंवा त्यानंतरही तुम्ही पायी चालू शकता. सकाळी 11 ते दुपारी 5 दरम्यान कधीही पायी चालायला जाऊ नका. कारण तुम्हाला गरम हवेमुळे उष्णाघाताची लागण होऊ शकते.

काय काळजी घ्याल?

पायी चालत असताना काही गोष्टींची काळजी घेणंही महत्वाचं ठरतं. उन्हाळ्यात जास्त वेळ पायी चालू नका, कारण घाम जास्त गेल्यानं तुमच्या शरीरात पाणी कमी होऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा जास्त थकवा जाणवू शकतो. तसेच डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते. वॉक हळू आणि कमी वेळ करावा. तुम्ही बाहेर जाण्याऐवजी घरातही पायी चालू शकता. महत्वाची बाब पायी चालताना सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि भरपूर पाणी प्या.

Web Title: Summer Walking Tips : What is best time for walk in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.