सुधा मुर्ती... हे नाव, नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय हे कितीही मोठं असलं तरी त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे अगदी सर्व सामान्यांसारखंच वाटावं असं.. . पाहताक्षणी कोणालाही त्या अगदी आपल्यातल्याच वाटतील एवढा साधेपणा, सहजपणा त्यांच्या वागण्या- बोलण्यातून दिसून येतो. वेगवेगळ्या विषयांवरच्या त्यांच्या मुलाखती आपण नेहमीच ऐकतो, पाहातो, वाचतो.. आता एका वेगळ्या विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आहे. त्यांच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग VOGUE India यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून यामध्ये सुधा मुर्ती यांनी डाएट, फिटनेस, वजन अशा सगळ्या गोष्टींवर चर्चा केली आहे. यामध्ये त्यांच्या सोबतीला आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर.. खाण्याच्या बाबतीत आपल्या मातीची नाळ अजिबात सोडायची नाही (Sudha Murty's Fitness And Health Tips), हा त्या दोघींचाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचलून धरत त्यांनी गप्पांना सुरुवात केली आहे.(Sudha Murty's opinion about ghar ka khana)
जे आपल्या मातीत उगवतं, जे आपल्या घरात खूप पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने खाल्लं जातं, तेच अन्न आपल्यासाठी पौष्टिक असतं असं त्या दोघींचंही ठाम मत. त्यामुळेच तर सुधा मुर्ती सांगतात की आजही ज्वारीची भाकरी हाच त्यांचा मुख्य आहार.
बटाटे २- ३ महिने साठवून ठेवण्यासाठी टिप्स- कोंब फुटून बटाटे अजिबात खराब होणार नाहीत
ज्वारीची भाकरी ताटात असली की मन कसं खुश होऊन जातं आणि थेट बालपणीच्या गावी जातं.. दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असाे.. जेवण झाल्यानंतर त्यांना कच्चे पोहे खायला खूप आवडतं. ४ चमचे कच्चे पोहे खाल्ले की ते जणू काही स्वर्गसुखच.. त्या म्हणतात की मग ते पोहे खाताना मी किती कॅलरी खाते आहे, त्याने वजन वाढेल का असा विचार अजिबात करत नाही. कारण ती गोष्ट मला नितांत आनंद देणारी आहे आणि तोच आनंद तर आयुष्यात महत्त्वाचा आहे.
मुळात तुम्ही वयाच्या १५ व्या वर्षी जशा आहात तशाच तुम्ही पन्नाशीत राहावं.. अशी अपेक्षा मुळीच धरू नका. कारण तुमची भुमिका, जबाबदाऱ्या, कामं हे सगळं जसं बदलतं तसंच तुमचं शरीरही बदलत जातं. त्यामुळे दरवेळी शरीराचा विचार करून तुमचं खाणं- पिणं ठरवू नका.
हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ६ सवयी, बघा यापैकी काही सवयी तरी तुम्हाला आहेत का?
सुधा मुर्तींनी सांगितलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुर्वी आम्हाला फक्त सणावाराला आणि लग्नकार्यातच गोड खायला मिळायचे. तेव्हा आईला मी नेहमी विचारायचे की असं का? आपण रोज गोड का नाही खात? पण त्या प्रश्नाचं उत्तर मला आता मिळत आहे.. रोज गोड खाऊन काय होतं ते आताची आजारपणं पाहून कळतं.. त्यामुळेच सगळ्या पदार्थांचा आनंद घ्या पण एका मर्यादेत राहूनच.. असा प्रेमळ सल्लाही त्यांनी दिला.