Lokmat Sakhi >Fitness > वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत

वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत

Weight Loss Perfect Exercise : असा एक एक्सरसाईज, वजन कमी करण्यासाठी जगात सगळ्यात जास्त केला जातो. या एक्सरसाईजला म्हणतात स्क्वाट. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:28 IST2025-04-12T16:18:37+5:302025-04-12T17:28:23+5:30

Weight Loss Perfect Exercise : असा एक एक्सरसाईज, वजन कमी करण्यासाठी जगात सगळ्यात जास्त केला जातो. या एक्सरसाईजला म्हणतात स्क्वाट. 

Squats exercise will help you to loose weight quickly, watch how to do it | वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत

वजन वेगानं कमी करणारा १ सोपा व्यायाम, शरीर होतं लवचिक आणि हाडंही होतात मजबूत

Weight Loss Perfect Exercise : चरबीमुळे वाढलेल्या वजनानं महिला खूप जास्त चिंतेत असतात. महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची कारणं वेगवेगळी असतात. महिला वाढलेलं वजन, पोटाचा वाढलेला घेर, मांड्या-कंबरेवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी नको नको ते उपायही करतात. काही महिला जेवण कमी करतात, काही महिला एक्सरसाईज करतात. पण फायदा मिळतोच असं नाही किंवा असंही म्हणुया की अनेकांना चरबी कमी करण्यासाठी परफेक्ट अशी एक्सरसाईजच माहीत नसते. त्याबाबतच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. असा एक एक्सरसाईज आहे, वजन कमी करण्यासाठी जगात सगळ्यात जास्त केला जातो. या एक्सरसाईजला म्हणतात स्क्वाट. 

लवकर वजन कमी करणारी एक्सरसाईज

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा एक्सरसाईज आहे काय? करायचा कसा? जसे आपण उठक-बैठक करतो त्याचाच हा प्रकार आहे. रोज सकाळी तीन सेटमध्ये १५ वेळा स्क्वाट केल्यास तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि कॅलरी कमी होतात. या एक्सरसाईज वेळी शरीर ऊर्जेचा वापर करतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होतात. तसेच स्क्वाटनं हार्ट रेटही वाढतो.

काय मिळतात फायदे?

स्नायू होतात मजबूत

तुम्ही जर रोज सकाळी स्क्वाट एक्सरसाईज कराल तर मांड्या, कंबरेतील स्नायू मजबूत होतात. नियमितपणे ही एक्सरसाईज कराल तर कंबरे खालच्या भागाची शक्ती आणि सहनशक्ती खूप वाढते. सोबतच वजनही वेगानं कमी होतं.

शरीर होतं लवचिक

स्क्वाट करून शरीर लवचिक होण्यासही मदत मिळते. खासकरून कंबर, गुडघे आणि टाचांमध्ये लवचिकता वाढते. जे लोक जास्त वेळ डेस्कवर बसून काम करतात, त्यांच्यासाठी कंबरेचं दुखणं दूर करण्यासाठी स्क्वाट खूप फायदेशीर ठरते. 

हाडांचं आरोग्य सुधारतं

स्क्वाट एक्सरसाईज हाडं मजबूत करण्यासाठी देखील मदत करते. महिलांना नेहमीच हाडं कमजोर झाल्याची समस्या होत असते. अशात त्यांच्यासाठी ही एक्सरसाईज खूप फायदेशीर ठरेल. वाढत्या वयासोबतच हाडांचं घनत्व कमी होऊ लागतं, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारखी समस्या होते. स्क्वाटनं ही प्रक्रिया स्लो होते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात.

Web Title: Squats exercise will help you to loose weight quickly, watch how to do it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.