बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान आपल्या साध्या, संतुलित आणि फिट लाईफस्टाईलसाठी नेहमीच चर्चेत असते. सोहा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम आपला आहार आणि एक्सरसाइजवर (soha ali khan morning drink secret) अधिक जास्त भर देते. अलीकडेच तिने सोशल मिडियावर तिच्या मॉर्निंग ड्रिंकची (Morning Drink) एक खास रेसिपी शेअर केली आहे. सोहा तिच्या दिवसाची सुरुवात खास मॉर्निंग ड्रिंक पिऊन करते.
सोहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती जीममधून आल्यानंतर किचनमध्ये ज्यूस तयार करताना दिसत आहे. या पोस्टसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘स्वतःवर प्रेम करणे खूप महत्त्वाचे आहे! मी गेल्या तीन महिन्यांपासून दररोज सकाळी रिकाम्या पोटी सफेद भोपळ्याचा (Ash Gourd) रस पीत आहे. हा रस शरीराला डिटॉक्स (Detox) करतो, थंडावा देतो आणि पोट निरोगी ठेवण्यास मदत करतो. कोहळ्याचा रस हा सोहाच्या फिटनेस रुटीनचा एक महत्वपूर्व भाग झाला आहे. सोहा सांगते, फक्त (soha ali khan white pumpkin juice recipe) एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यूस बनवण्यापूर्वी कोहळ्याचा एक छोटा तुकडा नक्की चाखून पाहा—जर तो कडू लागला, तर लगेच फेकून द्या. नेहमी ताजा, पिकलेला आणि कडू नसलेला कोहळाच ज्यूस तयार करण्यासाठी घ्यावा. जेणेकरून हे हेल्थ ड्रिंक तुम्हाला पूर्ण फायदा देऊ शकेल.’
सोहा अली खानचे खास मॉर्निंग ड्रिंक आहे फायदेशीर...
कोहळा किंवा पेठा, ज्याला इंग्रजीमध्ये ॲश गॉर्ड (Ash Gourd) म्हणतात, तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. कोहळ्याचे हे मॉर्निंग ड्रिंक पिण्यासाठी हलके आणि कमी कॅलरीज असलेले खास ड्रिंक आहे, जे पचन क्रिया सुरळीत ठेवतो आणि शरीराला दिवसभर ऊर्जा देतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतो आणि टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो. याच कारणामुळे आजकाल अनेक सेलिब्रिटीजनी याला आपल्या सकाळच्या हेल्दी ड्रिंक मध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली आहे.
सुपरफिट राहण्यासाठी अक्षय कुमार फॉलो करतो वडिलांनी सांगितलेला गोल्डन रुल! म्हणून दिसतो आजही तरुण...
कोहळ्याचे हेल्दी मॉर्निंग ड्रिंक कसे तयार करायचे ?
कोहळ्याचे मॉर्निंग ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला, कोहळा, पाणी, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कृती :-
कोहळ्याची साल व्यवस्थित सुरीच्या मदतीने काढून टाका आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करा. हे तुकडे एका खोलगट मिक्सरच्या भांड्यात टाका आणि वरून थोडे पाणी घाला. त्यानंतर, मिक्सर फिरवून मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करा, जोपर्यंत ज्यूस स्मूद होत नाही तोपर्यंत मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आता हा तयार झालेला ज्यूस गाळून घ्या. या गाळून घेतलेल्या ज्यूसमध्ये चवीनुसार थोडा लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मीठ घाला. सगळे जिन्नस व्यवस्थित चमच्याने मिसळा आणि पिण्यासाठी थंडगार सर्व्ह करा.
कोहळ्याचा रस पिण्याचे फायदे...
१. कोहळ्याचा रस शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढून रक्त शुद्ध करण्यात मदत करतो.
२. कोहळ्यातील फायबर आणि एन्झाइम्स पचनक्रिया सुधारतात व अॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता कमी करतात.
३. या ज्यूसमध्ये फॅट आणि कॅलरी कमी असतात, सोबतच फायबर भरपूर असल्याने हे वजन कमी करण्यासाठी उत्तम पेय आहे.
४. नियमित कोहळ्याचा रस पिल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
५. यात व्हिटॅमिन सी, झिंक आणि इतर पोषक तत्त्वे असतात जी शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.