Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

Side Effects of Walking Too Much : पायी चालण्यातही तुम्ही अति करत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसानच होईल. जास्त पायी चालल्यानं तुम्हाला काय काय नुकसान होतात हे जाणून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:23 IST2025-06-09T13:06:01+5:302025-06-09T17:23:02+5:30

Side Effects of Walking Too Much : पायी चालण्यातही तुम्ही अति करत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसानच होईल. जास्त पायी चालल्यानं तुम्हाला काय काय नुकसान होतात हे जाणून घेऊ.

Side Effects of Walking Too Much, You Should Know | रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

Side Effects of Walking Too Much : पायी चालणं हा एक परिपूर्ण असा व्यायाम मानला जातो. वजन कमी करण्यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यासाठी नेहमीच पायी चालण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण कोणत्याही गोष्टी अति ही नुकसानकारक असते. अशात पायी चालण्यातही तुम्ही अति करत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसानच (Side Effects of Walking Too Much) होईल. जास्त पायी चालल्यानं तुम्हाला काय काय नुकसान होतात हे जाणून घेऊ.

जास्त पायी चालण्याचे नुकसान

जॉइंट्समध्ये वेदना आणि जखम

पायी चालणं हा एक लो-इम्पॅक्ट व्यायाम मानला जातो. पण फार जास्त चालत असाल तर गुडघे, टाचा आणि कंबरेवर दबाव पडतो. जर तुम्हाला जास्त वेळ न थांबता वेगानं चालत असाल तर यानं जॉइंट्समध्ये वेदना, सूज किंवा जखम अशा समस्या होऊ शकतात. ज्यांना आधीच जॉइंट्ससंबंधी समस्या आहेत, त्यांनी जास्त चालणं टाळलं पाहिजे.

स्नायूंमध्ये थकवा आणि कमजोरी

पायी चालल्यानं स्नायू मजबूत होतात, पण प्रमाणापेक्षा जास्त चालल्यास स्नायूंची जास्त मेहनत होते. ज्यामुळे शरीरात थकवा, वेदना आणि कमजोरी जाणवते. तुम्ही जर सकाळी जास्त पावलं पायी चालत असाल आणि शरीराला आराम देत नसाल, तर स्नायूंची रिकव्हरी होत नाही. त्यामुळे स्नायू हळूहळू कमजोर होतात.

डिहायड्रेशन आणि एनर्जी कमी होते

जास्त लांब चालत असाल तर घाम जास्त येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. जर तुम्ही भरपूर पाणी पित नसाल तर डिहायड्रेशन, चक्कर येणे किंवा थकवा अशा समस्या होतात. सोबतच जास्त पायी चालल्यानं एनर्जीही कमी होते. अशात तुम्हाला दिवसभर सुस्ती आणि कमजोरी जाणवते.

झोपेची समस्या

पायी चालल्यानं स्ट्रेस कमी करण्यास आणि झोपेची क्वालिटी सुधारण्यास मदत मिळते. पण प्रमाणापेक्षा जास्त पायी चालल्यानं शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढू शकतं. यामुळे झोप न येण्याची समस्या होऊ शकते. खासकरून रात्री जास्त वॉक करत असाल तर शरीराला आराम मिळत नाही.

इम्यून सिस्टीमवर प्रभाव

एक्सरसाईजमुळे इम्यूनिटी बूस्ट होते, पण जास्त पायी चालल्यानं शरीरावर जास्त स्ट्रेस टाकला जातो. ज्यामुळे इम्यून सिस्टीम कमजोर होऊ शकतं आणि तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडू शकता. तुम्ही जर आराम न करता रोज खूप जास्त पायी चालत असाल तर शरीराची इम्यूनिटी कमजोर होऊ शकते.

Web Title: Side Effects of Walking Too Much, You Should Know