बॉलीवूडमधील फिटनेस आयकॉन्सच्या यादीमध्ये शिल्पा शेट्टीचं नाव नेहमी घेतलं जात. शिल्पा शेट्टी संपूर्ण भारतात 'योगा क्वीन' आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते. शिल्पा शेट्टी ( Shilpa Shetty favourites Ginger Ginger water) ही फक्त बॉलिवूड अभिनेत्री नाही तर ती एक फिटनेसप्रेमी देखील आहे. ती आपल्या अभिनयाबरोबरच फिटनेस, हेल्थ आणि सौंदर्याची देखील तितकीच काळजी घेताना दिसते. तिच्या त्वचेची ठेवणं, शरीराची लवचिकता आणि उत्साही व्यक्तिमत्त्व यामागे अनेक वर्षांची मेहनत (Shilpa Shetty morning Routine drink ginger water) आणि काही खास सवयी आहेत. वयाच्या ४० नंतरही तिची चपळता, सुंदर त्वचा आणि सडपातळ बांधा, एनर्जी पाहून अनेकजण विचारात पडतात. शिल्पा फिट (Health Benefits of Ginger Water) राहण्यासाठी तिच्या डेली रुटीनमध्ये योगासोबतच काही नैसर्गिक व घरगुती उपायांचाही वापर हमखास करते, त्यापैकी एक म्हणजे – आल्याचं पाणी. सकाळी उपाशीपोटी आल्याचं गरम पाणी पिणं हा तिचा फिटनेसचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे फक्त पचनासाठीच नव्हे, तर वेटलॉस, बॉडी डिटॉक्स आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतं(Shilpa Shetty's Healthy Ginger Water Drink Recipe).
तुम्हालाही शिल्पा शेट्टीसारखा त्वचेवर ग्लो आणि एनर्जी हवी आहे का? मग तिचं हे आल्याच्या पाण्याचं साधं गुपित एकदा आजमावून बघाच. सकाळी रिकाम्या पोटी घेतलं की शरीर डिटॉक्स होतं, पाचनक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग वाढतो. शिल्पा हाच उपाय वर्षानुवर्षं करते आणि त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर स्पष्ट दिसतो.
शिल्पा शेट्टीचा फिटनेस फंडा...
शिल्पा शेट्टी आपले आरोग्य व फिटनेस जपण्यासाठी, तिच्या दिवसाची सुरुवात एका हेल्दी ड्रिंकने करते. शिल्पाचे हे हेल्दी ड्रिंक दुसरे - तिसरे काही नसून चक्क आल्याचं पाणी आहे. आल्याचं पाणी तिच्या फिटनेस रूटीनचा महत्त्वाचा भाग आहे. आपले पचन सुधारण्यासाठी, पोटातील गॅस कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ती या हेल्दी ड्रिंकवर विश्वास ठेवते.
काय सांगता! गार पाणी प्यायलं तर वजन वाढत नाही, कमी होते! रिसर्चचा दावा, असे पाणी प्या...
सारा तेंडुलकर, केसांसाठी करते तिच्या आईने सांगितलेला पारंपरिक उपाय - पाहा तिचे हेअर केअर सिक्रेट!
आल्याचं पाणी तयार करण्याची पद्धत :-
साहित्य :-
१. आल्याचा तुकडा - १ ते २ इंच आल्याचा छोटा तुकडा
२. पाणी - १ ग्लास पाणी
कृती :-
सर्वात आधी आलं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून तुकडा किसून घ्या किंवा चिरून घ्या. एका पातेल्यात १ ग्लास पाणी गरम करा. त्यात आल्याचा तुकडा टाका आणि ५ ते १० मिनिटं उकळा. उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. आल्याचं पाणी पिण्यासाठी तयार आहे.
अळशीच्या इवल्याशा बिया करतात झरझर वजन कमी! पावसाळ्यात तब्येतही सुधारेल घसाही राहिल चांगला...
आल्याचं पाणी पिण्याचे फायदे :-
१. पचन सुधारते :- आल्यामध्ये असलेल्या एंजाईम्समुळे पचनक्रिया सुलभ होते आणि अपचन, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होतात.
२. डिटॉक्स :- आल्याचं गरम पाणी शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतं.
३. वजन कमी करण्यास मदत :- चयापचय क्रियेचा वेग (Metabolism) वाढवून फॅट बर्निंग प्रक्रिया जलद करते.
४. इम्युनिटी वाढवते :- आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
५. त्वचेला चमकदारपणा येतो :- त्वचा निरोगी, चमकदार आणि नॅचरल ग्लोइंग दिसते.