Lokmat Sakhi >Fitness > तूप-पराठा- लोणी सगळंच चापून खाते, तरी १५ किलो कमी कसे केले? पाहा भारतीच्या एका सवयीमुळे झाला कमालीचा वेटलॉस

तूप-पराठा- लोणी सगळंच चापून खाते, तरी १५ किलो कमी कसे केले? पाहा भारतीच्या एका सवयीमुळे झाला कमालीचा वेटलॉस

She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss : रोज तूप आणि पराठे खाणाऱ्या भारतीने १५ किलो वजन कमी केले. पाहा काय आहे तिचे गुपित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 08:10 IST2025-03-24T08:06:44+5:302025-03-24T08:10:01+5:30

She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss : रोज तूप आणि पराठे खाणाऱ्या भारतीने १५ किलो वजन कमी केले. पाहा काय आहे तिचे गुपित.

She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss | तूप-पराठा- लोणी सगळंच चापून खाते, तरी १५ किलो कमी कसे केले? पाहा भारतीच्या एका सवयीमुळे झाला कमालीचा वेटलॉस

तूप-पराठा- लोणी सगळंच चापून खाते, तरी १५ किलो कमी कसे केले? पाहा भारतीच्या एका सवयीमुळे झाला कमालीचा वेटलॉस

वजन कमी करण्यासाठी आपण सतत काही ना काही उपाय करत असतो. काहींचे वजन कमी कष्टांमध्येही कमी होते. तर काहींना बरेच प्रयत्न करूनही यश प्राप्त होत नाही.(She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss) प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असल्याने शरीराची काळजी घेतानाही वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. विविध प्रकारचे व्यायाम तसेच आहारही घ्यावा लागतो. मेटापोलिझमही प्रत्येकाचे वेगळे असते. (She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss)मात्र काही साध्या सोप्या गोष्टी असतात, ज्या प्रत्येकाने करायला हरकत नाही. 

वजन, त्वचा, आहार, व्यायाम आदी बाबतींमध्ये आपण सेलिब्रिटींना फार फॉलो करतो. कारण ते तेवढे मेंटेण्ड असतात. त्यांचा आहार तसेच रुटीन आदर्श असते. अनेक सेलिब्रिटी गोड तसेच चविष्ट पदार्थ खात नाहीत. आपण अनेकांना सांगताना ऐकतो की, दूध पिऊ नका, पनीर खाऊ नका. (She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss)हे पदार्थ तर आपण पौष्टिक मानतो मग तेही शरीरासाठी फायद्याचे नाहीत का? असा प्रश्न पडतो. मात्र या सगळ्या स्टेटमेंट्सपेक्षा फार वेगळी स्टेटमेंट कॉमेडी क्वीन भारती सिंगने दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीने कमालीचे वजन कमी केले आहे. तिचे वजन जवळपास ९१ ते ९५ होते पण तिने आता ते ७० वर आणले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आजही तिच्या आवडीचे पदार्थ पोटभर खात आहे. तिच्या व्लॉग्जमध्ये ती भरपूर तूप, पराठे, लोणी खाताना दिसते. तिला डाएट बद्दल विचारल्यावरही ती कायम मी सगळं खाते असंच सांगते. 

सगळं खाऊन पिऊनही ती वजन कसं कमी करत आहे? असा प्रश्न तिला सारखा विचारला जातो. भारतीने तिच्या मुलाखतींमध्ये तसेच व्लॉग्समध्ये तिचे वजन कमी करण्यामागील गुपित सांगितले. भारती म्हणाली, मी आता एक आई आहे. मुलाची काळजी घेतानाही वजन कमी होतेच. मी  सगळंच खाते. तसेच जीमही करत नाही. मात्र काही साधे व्यायाम रोज करते. मी घरचंच अन्न खाते. आपल्या भारतीय अन्नामध्ये फॅट्स असले तरी ते पदार्थ पौष्टिक असतात. भारतीने सांगितले मी जरी सगळं खात असले तरी माझ्या जेवणाच्या वेळा ठरल्या आहेत. त्या वेळीच मी खाते. इतर वेळी अन्नाला हातही लावत नाही. दुपारी १२ वाजता पोट भरून जेवते. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता जेवते. पण मग संध्याकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंतच्या वेळेत म्हणजेच रात्री ती काहीच खात नाही. तिच्या या खाण्याच्या सवयीमुळे तिने जवळपास १५ किलो वजन कमी केले.     

Web Title: She eats everything , yet how did she lose 15 kg? See how Bharti's one habit led to incredible weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.