Join us  

How lose weight faster : सारा अली खानचं वजन घटवण्याचं सोपं सिक्रेट; 'अशी' झाली फॅट टू सुपरफिट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:07 PM

How lose weight faster : साराच्या म्हणण्यानुसार, बिर्याणी, पनीर, पिझ्झा, छोले-बटूरे यांसारखे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ कितीही मोहात टाकत असले तरी आपण आपल्या जीवनात अनहेल्दी अन्न खाणं टाळलं पाहिजे. 

(Image Credit- Social Media)

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये तिचा अभिनय आणि फिटनेसने लोकांना खूप प्रभावित केले आहे. फॅट ते फॅब असा तिचा प्रवास तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितला आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लेकीने ग्रॅज्युएशन दरम्यान अमेरिकेत वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला.  यादरम्यान तिने अनेक किलो वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिने एका युथ समिटमध्ये सांगितले की, ती जास्त वजनामुळे कशी निराश झाली होती, पण तिने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वजन कमी केले. (Weight Loss Tips)

तिने सांगितले की, ''मला आठवते की मी वजन कमी करण्यासाठी जिममध्ये गेले होते आणि जड चेंडूने फक्त 3 क्रंच करू शकले, कारण त्यावेळी माझे वजन खूप होते आणि मी कोणत्याच अँगलनं फिट नव्हते. निराशेने, मी जिममध्ये जाणे थांबवले आणि स्वतःला विचारले, 'तुला काय येतं. कदाचित तू करू शकत नाही. मात्र, मी दुसऱ्या दिवशी उठले आणि पुन्हा जिमला गेले. तेथे आधी 4 क्रंच केले गेले, नंतर 5 आणि नंतर 6. आता मी एका क्रंच चॅलेंजसाठी तयार आहे.''   वजन घटवण्यासाठी रोज चालायला जाता? मग झटपट चरबी घटवण्यासाठी 'या' ५ गोष्टी ठेवा लक्षात

पीसीओडी आणि हार्मोनल प्रॉब्लेममुळे वेटवॉस करणं कठीण

सारा अली खान कॉफी विथ करण सीझन 6 मध्ये सैफ अली खानसोबत दिसली होती. पीसीओडी आणि वजन यांच्याशी झालेल्या संघर्षाबद्दल तिने ज्या आत्मविश्वासाने सांगितले ते कौतुकास्पद आहे. तिने सांगितले की, ''एक काळ असा होता जेव्हा माझे वजन ९८ किलो होते. मला PCOD चा त्रास होत होता. त्यामुळे मला हार्मोन्सचा त्रासही झाला होता. मी पण खूप खायचे. या सर्व गोष्टींमुळे वजन कमी करणे आणि हार्मोन्स संतुलित करणे माझ्यासाठी खूप कठीण झाले.'' खरंच जेवल्यानंतर चालण्याच्या सवयीनं अन्न लवकर पचतं? समोर आला रिसर्च

बीबीसीच्या एका मुलाखतीत साराने सांगितले की, जेव्हा तिला अभिनेत्री होण्याची इच्छा झाली तेव्हा तिचे वजन 96 किलो होते.  सारा म्हणाली की,'' मी चार वर्षांसाठी कोलंबियाला गेले आणि दुसऱ्या वर्षाच्या शेवटी मी अभिनय करायचा निर्णय घेतला. 96 किलो वजनासह ते थोडे कठीण होते. त्यानंतर अमेरिकेत खूप प्रयत्नांनी  माझे वजन कमी होऊ लागले.''

सारा स्वतः कबूल करते की कॉलेजच्या पहिल्या दोन वर्षात तिने टॉम्स पिझ्झा आणि अनहेल्दी अन्न खाल्ले.साराच्या म्हणण्यानुसार, बिर्याणी, पनीर, पिझ्झा, छोले-बटूरे यांसारखे तोंडाला पाणी आणणारे पदार्थ कितीही मोहात टाकत असले तरी आपण आपल्या जीवनात अनहेल्दी अन्न खाणं टाळलं पाहिजे. 

टॅग्स :हेल्थ टिप्ससारा अली खानवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स