सध्याच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये 'फिट राहणं' हे फारच गरजेचं झालं आहे. पण सगळ्यांना जिमला जाण्यासाठी वेळ, पैसा किंवा सुविधा मिळेलच असं नाही. फिटनेस, डाएट, पॅरेंटिंग आणि खाण्यापिण्याशी संबंधित टिप्स ती नियमितपणे सोशल मिडियावर शेअर करत असते. फिटनेसबाबत समीरा विशेषतः खूप अॅक्टिव्ह असून ती तिच्या (Sameera Reddy Do This Home Workout To Stay Fit) चाहत्यांनाही फिट राहण्यासाठी (How To Lose Weight Without Going To The Gym) सतत प्रेरित करत असते. अशा परिस्थितीत, बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Sameera Reddy shares weight loss tips) एक उत्तम उदाहरण ठरते. ती जिमला न जाता घरीच, अगदी घरातल्या वस्तूंच्या मदतीने, आपले फिटनेस रूटीन फॉलो करते आणि आपल्या चाहत्यांनाही तेच करण्याचा सल्ला देते(Home Workout For Weight Loss).
समीराचं म्हणणं आहे की, "फिट राहण्यासाठी भारी, महागडी जीम इक्विपमेंट लागतातच असं नाही. गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची आणि थोड्याशा कल्पकतेची." समीराने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करत, आपण घरातील खुर्ची, जिने, मादी पुसायचा मॉप किंवा मुलांच्या दप्तरांचाही उपयोग करून परिणामकारक व्यायाम करू शकतो हे दाखवून दिले आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये समीरा काही एक्सरसाइज दाखवत आहे ज्या ती घरच्याघरीच करते. समीरा (Sameera Reddy) असं म्हणते की, “जिमला जाण्याची गरज उरली नाही, कारण आपण घरीच हे साधेसोपे वर्कआउट करून फिट राहू शकता.” फिट राहण्यासाठी समीरा घरातल्या वस्तूंचाच वापर करुन कशीही एक्सरसाइज करते ते पाहूयात...
समीरा रेड्डी घरच्याघरीच करते हे साधेसोपे वर्कआऊट...
१. स्टेअरकेस क्लाइंब्स :- हा एक्सरसाइजचा प्रकार घरातल्या जिन्यावर अगदी सहज करता येतो. फक्त जिन्यावर चढणं आणि उतरण्याच्या चांगला कार्डिओ वर्कआउट होतो. यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज भासत नाही. ही एक्सरसाइज रोज ३० ते ४५ सेकंदांपर्यंत सलग करु शकता. यामुळे पायांतील ताकद वाढते, हृदयाची कार्यक्षमता सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज देखील बर्न होतात.
२. वेटेड स्क्वॅट्स :- या प्रकारात स्क्वॅट्स करण्यासाठी आपण घरातील लहान मुलांच्या पाठीवरच्या दप्तरांचा वापर करु शकता. घरातच उपलब्ध असलेल्या वस्तूंसह ही एक्सरसाइज सहज करता येते. जाडजूड पुस्तके बॅगेत भरून खांद्यावर बॅग लावून समीरा हा एक्सरसाइजचा प्रकार अगदी सहज करते. या एक्सरसाइजमुळे तुमच्या मांड्या, पाय, पोटऱ्यांकडील भागांतील स्नायूंना अधिक बळकट करण्यास मदत होते. प्रत्येक सेटमध्ये १२ ते १५ स्क्वॅट्स करा आणि तुमची पोजिशन योग्य आहे याची खात्री घ्या.
सेलिब्रिटी फिटनेस गुरु मिकी मेहता सांगतात, वेटलॉससाठी ७-७-७ चा मंत्र! म्हणून तर ते दिसतात फिट...
३. इन्क्लाइन पुशअप्स :- हा एक सोपा एक्सरसाइजचा प्रकार आहे. जो छाती, खांदे आणि हातांच्या स्नायूंना मजबूत ठेवण्याचे काम करतो. हा एक्सरसाइजचा प्रकार तुम्ही घरातील टेबल किंवा बेडच्या सहाय्याने करू शकता. दोन्ही हातांचे पंजे टेबल किंवा बेडसारख्या उंच पृष्ठभागावर ठेवा आणि शरीर सरळ ठेवून पुशअप्स करा. एका सेटमध्ये ८ ते १२ पुशअप्स करता येऊ शकतील.
व्यायामाला वेळ नाही? महिलांनो, 'या' ३ पद्धतीने रोज चाला-लोक विचारतील वजन कमी करण्याचं सिक्रेट...
४. लेटरल लंजेस :- हा एक्सरसाइजचा प्रकार मांड्या, हिप्स आणि पायांसाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे शरीर लवचिक बनते. यासाठी तुम्ही बाल्कनीच्या रेलिंगचा आधार घेऊ शकता. दोन्ही हात रेलिंगवर ठेवा आणि पायांत थोडे अंतर ठेवून उभे राहा. त्यानंतर शरीर हलकेसे पुढे झुकवा मग अशी उजव्या बाजूला झुकून उजव्या गुडघ्यावर वजन आणा, मग डाव्या बाजूनेही तेच करा. प्रत्येक बाजूला ६ ते १० वेळा असेच करा.
५. सीटेड गुड मॉर्निंग :- सीटेड गुड मॉर्निंग हा एक सोपा आणि परिणामकारक एक्सरसाइज प्रकार आहे. जो तुम्ही खुर्चीत बसल्या बसल्या देखील करू शकता. हा एक्सरसाइज प्रकार खासकरून पाठीच्या खालच्या भागासाठी, हॅमस्ट्रिंग्स आणि कोअरसाठी फायदेशीर आहे. एका खुर्चीवर सरळ बसा. दोन्ही पायात थोडे अंतर ठेवून पसरवून घ्या. हात छाती सामोरे आडवे राहतील असे क्रॉस करा. आता शरीराला हळूहळू पुढे झुकवा, पण पाठीचा कणा सरळ ठेवा. मग पुन्हा सरळ बसण्याच्या स्थितीत या. एका सेटमध्ये १२ ते १५ वेळा आपण असे करु शकता.
६. शोल्डर रोटेशन्स :- हा एक्सरसाइजचा प्रकार खांद्यांच्या लवचिकतेसाठी आणि मजबूतपणासाठी खूप उपयुक्त आहे. तसेच हा प्रकार घरी अगदी सहज करता येतो आणि यासाठी कोणतेही जिम इक्विपमेंट लागणार नाही. घरातील झाडूचा दांडा किंवा मॉपिंचा रॉड घ्या. दोन्ही हातांनी रॉड पकडा आणि हात डोक्याच्या वर सरळ करा. आता हातांना शरीराच्या गोलाकार हालचालीमध्ये मागच्या बाजूला वळवा, म्हणजे शोल्डर रोटेट होतील. मग पुन्हा पुढच्या बाजूला आणा. प्रत्येक बाजूने ८ ते १० वेळा असे करा.
समीराच्या मतानुसार, या संपूर्ण वर्कआउट सेटचे २ ते ३ राउंड्स नियमितपणे करावेत. यामुळे फक्त तुमचे शरीरचं ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहणार नाही, तर तुम्हाला तुमच्या शरीरावर आणि मनावरही एक प्रकारचं कंट्रोल जाणवेल. ती असंही सांगते की, “वर्कआउट केवळ फिट दिसण्यासाठी नाही, तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी देखील मदत करतात.