Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > फॅमिली मॅन फेम समंथाचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडीओ; मीराबाईकडून घेतेय प्रेरणा! पाहा व्हिडीओ

फॅमिली मॅन फेम समंथाचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडीओ; मीराबाईकडून घेतेय प्रेरणा! पाहा व्हिडीओ

Samantha's workout :  मीराबाईचं हे यश पाहता तिच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटण्याची तयारी दाखवली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 12:28 IST2021-07-26T12:04:23+5:302021-07-26T12:28:43+5:30

Samantha's workout :  मीराबाईचं हे यश पाहता तिच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटण्याची तयारी दाखवली आहे. 

Samantha's workout : Olympian mirabai chanu is samantha ruth prabhu's sunday workout inspiration | फॅमिली मॅन फेम समंथाचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडीओ; मीराबाईकडून घेतेय प्रेरणा! पाहा व्हिडीओ

फॅमिली मॅन फेम समंथाचा जबरदस्त वर्कआऊट व्हिडीओ; मीराबाईकडून घेतेय प्रेरणा! पाहा व्हिडीओ

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आणि पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली. पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.  मीराबाईचं हे यश पाहता तिच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटण्याची तयारी दाखवली आहे. 

आपल्या आवडत्या भारतीय सेलिब्रिटींना मात्र मिराबाईच्याच्या कर्तृत्वाचे कौतुक करायला वेळ मिळालेला नाही. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने चॅम्पियनपासून प्रेरणा घेत आता एक पाऊल पुढे टाकले आहे. अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये व्हिडिओ शेअर केला आणि पोस्टमध्ये अ‍ॅथलीटला टॅग केले. तिने ‘मीराबाई चानू, रविवारची प्रेरणा’ असं कॅप्शनमध्ये लिहिले असून  ५ इमोजी पोस्ट केल्या आहेत.

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पहिल्या सामन्यात विजय नोंदविल्याबद्दलच्या पोस्टसह समंथानं टॅग केलं आणि सिंधूला टॅग करत   “Absolute rockstar.” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचं नाव उज्जवल करत असलेल्या इतर अनेक भारतीय चॅम्पियन्सचे कौतुक करायला  संमथा विसरलेलीनाही. रविवारी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक मिळवून दिल्याने अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट शेअर  करत कौतुक केलं आहे. 

समंथा रुथ प्रभु तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे. मनोज बाजपेयी यांच्यासह तिनं ‘द फॅमिली मॅन’ या वेब मालिकेच्या दुसर्‍या सिजनमध्ये भुमिका स्विकारली आहे. समंथानं अभिनेता नागा चैतन्यशी लग्नगाठ बांधली असून  नागा चैतन्यसह तिने ये माया चेसावे या चित्रपटातून डेब्यू केला होता.

Web Title: Samantha's workout : Olympian mirabai chanu is samantha ruth prabhu's sunday workout inspiration