Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? सद्गुरू सांगतात ४ गोष्टी करा, जीममध्ये न जाता बारीक व्हाल

पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? सद्गुरू सांगतात ४ गोष्टी करा, जीममध्ये न जाता बारीक व्हाल

Easy Way To Lose weight And Belly Fat : सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी वजन कमी करण्यासाठी एक सोपा इफेटिव्ह उपाय सांगितला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 20:59 IST2026-04-13T20:28:42+5:302026-04-13T20:59:29+5:30

Easy Way To Lose weight And Belly Fat : सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी वजन कमी करण्यासाठी एक सोपा इफेटिव्ह उपाय सांगितला आहे. 

Sadhguru Reveals A Very Easy Way To Lose weight And Belly Fat Will Reduce Without Gym | पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? सद्गुरू सांगतात ४ गोष्टी करा, जीममध्ये न जाता बारीक व्हाल

पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? सद्गुरू सांगतात ४ गोष्टी करा, जीममध्ये न जाता बारीक व्हाल

आजकाल आपलं वजन कमी व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढलेलं वजन फक्त तुमची पर्सनॅलिटी खराब करत नाही तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. याव्यतिरिक्त लठ्ठपणा अनेक आजारांचं कारण ठरतो. वाढलेलं वजन कमी करणं खूपच आव्हानात्मक असते. अशा स्थितीत वजन कमी करण्यासाठी लोक डाएटपासून वर्कआऊटपर्यंत बरेच प्रयत्न करतात पण तरीही वजन कमी होत नाही. (Easy Way To Lose weight And Belly Fat)

सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी वजन कमी करण्यासाठी एक सोपा इफेटिव्ह उपाय सांगितला आहे. हा उपाय केल्यास तुम्ही जीमला न जाता भराभर वजन कमी करू शकता. बऱ्याच लोकांना जीमला जाण्याची इच्छा असते पण वेळेअभावी जाता येत नाही. त्यांच्यासाठी हा उपाय गुणकारी ठरू शकतो. (Sadhguru Reveals A Very Easy Way To Lose weight And Belly Fat Will Reduce Without Gym)

वजन कमी करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासूदेव सांगतात खास उपाय

१) सद्गुरू सांगतात की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर रोज फिजिकल एक्टिव्हीटीज करायला हव्यात. महिला असो किंवा पुरूष ८ ते ९ तास बसून काम करणाऱ्या लोकांनी फिजिकली एक्टिव्ह राहायलाच हवं.

 २) योगा वजन कमी  करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे फक्त शारिरीक विकास होत नाही तर मानसिक विकासही होतो.

३) सद्गुरू सांगतात की रोज रनिंग आणि वॉक करणं खूप गरजेचं आहे.  ज्यामुळे बेली फॅट कमी होतो आणि हॉर्ट हेल्थ चांगली राहण्यासही मदत होते.

४) सद्गुरू सांगतात की वजन कमी करण्यासाठी जिमचा मार्ग निवडू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही जिमला जाणं बंद करता तेव्हा शरीर पुन्हा आधीसारखं होऊ लागतं. घरीच योगा करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता.

त्यांच्यामते दिवसभरात आपण ४० ते ५० टक्के  अन्नात  काही भाज्या, ड्राय फ्रुट्स, मोड आलेली कडधान्य यांचा आहारात समावेश करायला हवा. या अन्नात असे काही एन्जाईम्स असतात जे   शरीराला आतून निरोगी ठरतात. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. कारण पाण्याशिवाय आपलं शरीर मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणं कठीण होतं. 

Web Title : पेट की चर्बी घटाएं बिना जिम: सद्गुरु के 4 वेट लॉस टिप्स

Web Summary : सद्गुरु वजन घटाने के लिए शारीरिक गतिविधि, योग, दौड़ना और पैदल चलना बताते हैं। जिम पर निर्भरता से बचें; घर पर योग करें। स्वस्थ शरीर के लिए आहार में सब्जियां, अंकुरित अनाज और सूखे मेवे शामिल करें। संपूर्ण स्वास्थ्य के लिए हाइड्रेटेड रहें।

Web Title : Shed belly fat without gym: Sadhguru's 4 tips for weight loss.

Web Summary : Sadhguru suggests physical activity, yoga, running, and walking to lose weight effectively. Avoid gym dependency; embrace home yoga. Include vegetables, sprouts, and dry fruits in your diet for a healthy body. Stay hydrated for overall well-being.