Lokmat Sakhi >Fitness > तुम्ही किती पाऊलं चालता यापेक्षाही महत्वाचं आहे ‘कसं’ चालता? पाहा चालण्याची योग्य पद्धत

तुम्ही किती पाऊलं चालता यापेक्षाही महत्वाचं आहे ‘कसं’ चालता? पाहा चालण्याची योग्य पद्धत

Walking Tips : द लान्सेटच्या एका रिसर्चनुसार, आपण किती पाऊलं चाललो हे महत्वाचं नाही तर चालतो कसे हे जास्त महत्वाचं ठरतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:00 IST2025-08-13T12:22:23+5:302025-08-13T14:00:45+5:30

Walking Tips : द लान्सेटच्या एका रिसर्चनुसार, आपण किती पाऊलं चाललो हे महत्वाचं नाही तर चालतो कसे हे जास्त महत्वाचं ठरतं.

Research reveals walking technique is more important than steps | तुम्ही किती पाऊलं चालता यापेक्षाही महत्वाचं आहे ‘कसं’ चालता? पाहा चालण्याची योग्य पद्धत

तुम्ही किती पाऊलं चालता यापेक्षाही महत्वाचं आहे ‘कसं’ चालता? पाहा चालण्याची योग्य पद्धत

Walking Tips : चालणं हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे. फिट आणि निरोगी राहण्यासाठी भरपूर लोक चालतात. वजन कमी करण्यासाठी सुद्धा लोक रोज पायी चालतात. चालण्याबाबत लोकांमध्ये एक ट्रेण्ड बघायला मिळतो. म्हणजे बरेच लोक ते रोज किती पाऊलं चालतात याचा रेकॉर्ड ठेवतात. पण द लान्सेटच्या एका रिसर्चनुसार, आपण किती पाऊलं चाललो हे महत्वाचं नाही तर चालतो कसे हे जास्त महत्वाचं ठरतं.

आजच्या धावपळीच्या जीवनात रोज १० हजार पाऊलं चालणं सगळ्यांसाठी शक्य होत नाही. लान्सेटनं अलिकडच्या रिसर्चमध्ये १० ऐवजी ७ हजार पाऊलं चालणंही फायदेशीर मानलं आहे. रोज जर इतके चालाल तर कॅन्सर, हृदयरोग, लठ्ठपणा या समस्या टाळू शकता.

रोज पायी चालण्याची जर सवय लावली तर अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो, जसे की, डायबिटीस, हायपरटेंशन आणि इतरही वेगळ्या हृदयरोगांचा यात समावेश आहे. इतकंच नाही तर रोज पायी चालून आपण आपलं आयुष्यही वाढवू शकता.

माइंडफुल वॉकिंग

आजकाल माइंडफुल वॉकिंगचा ट्रेण्ड खूप वाढला आहे. यात चालताना श्वासांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं जातं. चालताना निसर्गासोबत जुळण्याचा प्रयत्न केला जातो. असं केल्यानं स्ट्रेस कमी होतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. 

इंटरव्हल वॉक

जर आपण रोज एकसारख्या स्पीडनं चालत असाल तर आपलं शरीर त्यानुसार स्वत:ला वळण लावतं. इंटरव्हल वॉकिंग करून आपल्याला अधिक फायदा मिळू शकतो. यात आपल्याला कधी हळू तर कधी फास्ट चालावं लागतं.

जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलाजीनुसार, जे लोक तीन मिनिटं जास्त स्पीडनं चालले, नंतर हळू चालले आणि तीस मिनिटांनी पुन्हा ही प्रक्रिया केली. त्यांना वेगवेगळे फायदे अधिक मिळाले. पाच महिने इंटरव्हल वॉक केल्यानं पायांचे स्नायू मजबूत होतात, ब्लड प्रेशर सुधारतं आणि फिटनेस चांगली राहते. इंटरव्हल वॉकनं हार्ट बीट सुधारतात, स्टॅमिना वाढतो आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगानं होते. 

Web Title: Research reveals walking technique is more important than steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.