>फिटनेस > पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ आसनं; दिसा स्लिम, राहा फिट

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ आसनं; दिसा स्लिम, राहा फिट

पोटावरचे वाढलेले टायर्स कसे कमी करायचे किंवा ते वाढू नये म्हणून काय करायचे, हा प्रत्येकीसमाेर पडलेला प्रश्न. म्हणूनच तर हे तीन आसन नियमितपणे करा आणि दिसा स्लिम, राहा फिट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 06:54 PM2021-09-25T18:54:32+5:302021-09-26T17:48:52+5:30

पोटावरचे वाढलेले टायर्स कसे कमी करायचे किंवा ते वाढू नये म्हणून काय करायचे, हा प्रत्येकीसमाेर पडलेला प्रश्न. म्हणूनच तर हे तीन आसन नियमितपणे करा आणि दिसा स्लिम, राहा फिट.

Regularly do 3 asanas to reduce belly fat; Look slim, stay fit | पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ आसनं; दिसा स्लिम, राहा फिट

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी नियमित करा ३ आसनं; दिसा स्लिम, राहा फिट

Next
Highlightsपोटावरची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आसन

आपण जाड होऊ लागलो आहोत, याचा सगळ्यात आधी अंदाज येतो तो आपल्या पोटावरून. पोटाचा घेर वाढत चालला आणि त्यावर टायर वाढणे सुरू झाले आहे, असे लक्षात आले तर लगेचच जागरुक व्हा. कारण एकदा का टायर वाढायला सुरुवात झाली की मग परत स्लीम ट्रीम बेली मिळवणं अतिशय अवघड होऊन बसतं. त्यामुळे अगदी कमी वयापासूनच ही तीन आसनं नियमितपणे करत जा. यामुळे निश्चितच तुमच्या पोटावरची चरबी कमी होईल आणि तुम्ही दिसू लागाल एकदम फिट. 

 

१. भुजंगासन
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हे अतिशय प्रभावी आसन आहे. शिवाय भुजंगासन करण्यास एकदम सोपं आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीच्या बाजूला ठेवा व हळूवार श्वास घेत शरीर वर उचला. नाभीपर्यंत शरीर वर उचलले जाईल, याकडे लक्ष द्या. मान छताच्या दिशेने असायला हवी. एखादा मिनिट ही आसन स्थिती टिकवून ठेवा. किंवा असे शक्य झाले नाही तर आसन स्थिती सोडा आणि पुन्हा पहिल्यापासून सांगितल्याप्रमाणे आसन करा.  

Photo Credit- Google

२. उष्ट्रासन
उष्ट्रासन केल्यामुळे दंड, मांड्या, पाठ, कंबर आणि पोट या सगळ्या अवयवांचा व्यायाम होतो. त्यामुळे त्या भागांच्या मांसपेशी मजबूत करण्यासाठी हे आसन अतिशय योग्य आहे. उष्ट्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात बसा. यानंतर गुडघे जमिनवर ठेवून शरीर उचला. गुडघ्यांवर उभे राहिल्यानंतर मान मागच्या बाजूने वळवा. दोन्ही हात मागच्या बाजूला सरकवा आणि देान्ही हातांनी तुमचे दोन्ही पायांचे घोटे धरण्याचा प्रयत्न करा. साधारण एक मिनिट ही आसन स्थिती टिकवून ठेवा. 

 

३. नौकासन
हे आसन केल्याने पोटाच्या मांसपेशी चांगल्याच ताणल्या जातात. त्यामुळे पोटाची चरबी झरझर उतरण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते. पोटासोबतच मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी देखील नौकासन उपयुक्त आहे. नौकासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर दोन्ही पाय तीस अंशावर उचला. याचवेळी डोके, पाठ  आणि हात उचला. हात पायाच्या दिशेने पण जमिनीला समांतर असतील, अशा बेताने ठेवा. ही आसनस्थिती अवघड आहे, पण प्रयत्न केल्यास जमणे कठीण नाही. साधारण ३० सेकंद तरी ही आसन स्थिती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. 
 

Web Title: Regularly do 3 asanas to reduce belly fat; Look slim, stay fit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

कोरोनाकाळात व्हिटॅमिन सीचा मारा केला, त्याने तर तुमची मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येत नाही? - Marathi News | If you take vitamin C more during corona period, does it cause your period to come sooner or later? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोरोनाकाळात व्हिटॅमिन सीचा मारा केला, त्याने तर तुमची मासिक पाळी लवकर किंवा उशिरा येत नाही?

मासिक पाळी पुढे-मागे होण्याची अनेक कारणे असतात. जीवनशैलीतील अनेक घटकांवर हा बदल अवलंबून असतो. पण व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात घेतले तरीही ही समस्या उद्भवू शकते... ...

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं - Marathi News | Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ...

बिनधास्त खा सीताफळ! सीताफळ नको म्हणत हे 4 गैरसमज असतील तर विसरा, कारण... - Marathi News | Eat custard apple without hesitation! If there are 4 misconceptions about not saying custard apple, forget it, because ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिनधास्त खा सीताफळ! सीताफळ नको म्हणत हे 4 गैरसमज असतील तर विसरा, कारण...

सीताफळ खूप आवडतं, पण आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे खाऊ शकत नाही. आपल्याला असलेल्या समस्यांसाठी सीताफळ चालत नाही हे आपण स्वत:च ठरवलेलं असतं. पण याबाबतचे गैरसमज आणि सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. ...

70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात - Marathi News | 70 year old mom, how is that possible? Do you risk becoming a parent in old age, doctors say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात

स्वत:चे मूल असावेसे वाटणे स्वाभाविक आहे, पण वयाच्या सत्तरीतही ही इच्छा कायम असणे आणि त्यासाठी उपचार घेऊन बाळाला जन्म देणे खरंच सोपं आहे का? ...

khushboo sundar losses 15 kg : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट? - Marathi News | Tollywood south actress khushboo sundar losses 15 kg picture goes viral on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : साऊथस्टार, पॉवरफुल राजकीय  लीडर खुशबूने झरझर घटवलं १५ किलो वजन; काय आहे वेटलॉस सिक्रेट?

khushboo sundar losses 15 kg : खुशबू सुंदरने 15 किलो वजन कमी करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिचा लूक बदलल्यापासून सगळ्यांनाच तिच्या फिटनेस सिक्रेट जाणून घेण्याची इच्छा आहे.  ...

अमेरिकन प्रिव्हेन्टीव टास्क फोर्स सांगतेय ॲस्पिरिनचे साइड इफेक्टस; तुम्हीही सर्रास ही गोळी घेता? - Marathi News | Do you take aspirin? Then read this ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमेरिकन प्रिव्हेन्टीव टास्क फोर्स सांगतेय ॲस्पिरिनचे साइड इफेक्टस; तुम्हीही सर्रास ही गोळी घेता?

संशोधनामुळे सतत नवनवीन गोष्टी समोर येत असतात. याआधी आरोग्याच्या काही तक्रारींवर उपयुक्त असलेले औषध इतर बाबतीत मात्र धोक्याचे ठरु शकत असल्याचे नुसकतेच समोर आले आहे. भारतात सर्रासपणे घेतली जाणारी अॅस्पिरीनच्या औषधाविषयी... ...