Lokmat Sakhi >Fitness > पोटावरच्या जाडजूड वळ्या-कंबरेचा वाढलेला घेर कमी करायचाय, पाहा रामदेव बाबांनी सांगितलेला उपाय

पोटावरच्या जाडजूड वळ्या-कंबरेचा वाढलेला घेर कमी करायचाय, पाहा रामदेव बाबांनी सांगितलेला उपाय

Ramdev Baba Suggests 5 Yogasana For Fast Weight Loss: पोटावरची चरबी, कंबरेवर असणारी चरबी कमी करायची असेल तर ही काही योगासनं नियमितपणे करावी, असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.(how to reduce belly fat?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2025 16:52 IST2025-07-23T16:45:10+5:302025-07-23T16:52:51+5:30

Ramdev Baba Suggests 5 Yogasana For Fast Weight Loss: पोटावरची चरबी, कंबरेवर असणारी चरबी कमी करायची असेल तर ही काही योगासनं नियमितपणे करावी, असा सल्ला रामदेव बाबा यांनी दिला आहे.(how to reduce belly fat?)

Ramdev baba suggests 5 yogasana for fast weight loss, how to reduce belly fat and the fats on waist | पोटावरच्या जाडजूड वळ्या-कंबरेचा वाढलेला घेर कमी करायचाय, पाहा रामदेव बाबांनी सांगितलेला उपाय

पोटावरच्या जाडजूड वळ्या-कंबरेचा वाढलेला घेर कमी करायचाय, पाहा रामदेव बाबांनी सांगितलेला उपाय

Highlightsपोट आणि कंबरेवरची चरबी कशी कमी करावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ रामदेव बाबा यांनी  साेशल मीडियावर शेअर केला आहे. 

प्रत्येकाचीच जीवनशैली आता खूप बदललेली आहे. कामांचा व्याप प्रत्येकाच्याच मागे खूप वाढला आहे. प्रत्येक जण खूप काम करतो आहे, पण ती सगळी कामं एका जागी बसून केली जात आहेत. शारिरीक हालचाली, कष्ट कमी झाले आहेत. त्यातच आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. व्यायाम करण्यासाठी प्रत्येकाला वेळ मिळतोच असे नाही. त्यामुळे मग याचा परिणाम वाढत्या वजनाच्या स्वरुपात शरीरावर दिसून येतो. वाढतं वजन कमी कसं करायचं किंवा नियंत्रणात कसं ठेवायचं, तसेच सुटलेलं पोट कसं कमी करायचं याची चिंत अनेकांना आहे (how to reduce belly fat?). तुमची ही चिंता कशी कमी करायची ते पाहा..(Ramdev baba suggests 5 yogasana for fast weight loss)

 

पोट आणि कंबरेवरची चरबी कमी करण्यासाठी रामदेव बाबा यांनी सांगितलेले उपाय

पोट आणि कंबरेवरची चरबी कशी कमी करावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ रामदेव बाबा यांनी  साेशल मीडियावर शेअर केला आहे. 

अपचनाचा नेहमीचाच त्रास- पोट फुगून गच्च होतं? रात्री झोपण्यापुर्वी करा ३ उपाय- सकाळी पोट साफ

१. पहिला व्यायाम म्हणजे दोन्ही पाय पसरवा आणि त्यांच्यामध्ये शक्य तेवढं अंतर ठेवा. यानंतर कंबरेतून खाली वाकत उजवा तळहात डाव्या पायाला तर डावा तळहात उजव्या पायाला असं एकानंतर एक या पद्धतीने साधारण एखादा मिनीट करा.

 

२. यानंतर त्याच स्थितीत बसून कंबरेतून उजव्या बाजुला वळा. दोन्ही तळहात जमिनीवर टेकवा. यानंतर अशाच पद्धतीनेे डाव्या बाजुनेही वळून व्यायाम करा. यामुळे कंबरेवरची वाढलेली चरबी कमी होईल.

Ranbhajya :पावसाळ्यात फक्त ४ महिने मिळणारी करटोली श्रावणात तर खायलाच हवी, अस्सल चव-पाहा रेसिपी

३. तिसरा व्यायाम म्हणजे दोन्ही पाय समाेर पसरलेले असू द्या, फक्त ते जोडून घ्या. यानंतर दोन्ही तळहात एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि जात्यावर दळण दळल्याप्रमाणे छातीपासून ते तळपायापर्यंत गोलाकार हात हलवा. उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असे प्रत्येकी १० वेळा करावे.

 

४. चौथा व्यायाम म्हणजे मर्कटासन. यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही तळहात दोन्ही बाजुला पसरवा. पाय गुडघ्यातून वाकवून तळपाय शरीराच्या जवळ आणा. यानंतर उजव्याबाजुने गुडघे जमिनीला टेकवून चेहरा डावीकडे करा. यानंतर डाव्या बाजुने गुडघे जमिनीला टेकवून चेहरा उजवीकडे करा.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल तर आजारीच पडाल! पोट खराब होऊन ॲसिडीटीही वाढू शकते 

५. यानंतर पाठीवर झोपून दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवणे, दोन्ही पाय एकदम वर उचलून काटकोनात घेणे असे व्यायाम केल्यानेही पोटावरची चरबी कमी होण्यास मदत हाेते.


 

 

Web Title: Ramdev baba suggests 5 yogasana for fast weight loss, how to reduce belly fat and the fats on waist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.