हल्ली प्रत्येकाच्याच मागे कामाचा प्रचंड लोड आहे. काही ना काही ताण प्रत्येकाला आहे. स्पर्धा प्रचंड वाढल्याने प्रत्येकालाच जोर लावून पळावं लागत आहे. या पळण्याच्या शर्यतीत मग कधी कधी स्वत:कडे दुर्लक्ष होतं. तब्येत, मानसिक आरोग्य बिघडत जातं. त्यामुळे मग मनाची शांतीही हरवते. मनावर खूप ताण येतो. शरीरावरचा, मनावरचा ताण वाढला की मग त्यातून आरोग्याच्या कित्येक नव्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्या सगळ्या कमी करायच्या असतील तर आता हा एक सोपा उपाय करून पाहा. फक्त काही मिनिटांचा हा उपाय बघा तुम्हाला कसं रिफ्रेश करून टाकतो...
मनावरचा ताण कमी करण्याचा सोपा उपाय
हा उपाय नेमका कसा करायचा आणि त्याचे काय काय फायदे होऊ शकतात, याची माहिती suhasiniyog या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये जो उपाय सांगितलेला आहे, तो करण्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसा. त्यानंतर दोन्ही हातांची बोटं दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. त्यानंतर तुम्हाला शक्य होईल तेवढा दिर्घ श्वास घ्या. अगदी छातीभरून श्वास घ्या आणि गुडघ्यांवर हाताने दाब देत देत मान वर करून आकाशाकडे पाहा. जेवढा वेळ सहज शक्य होईल तेवढा वेळ अशाच पद्धतीने मानेला ताण द्या. हा व्यायाम दिसायला अगदी साधा असला तरी त्याचे खूप फायदे आहेत. एक्सपर्ट सांगतात की असं दिवसातून १० वेळा तरी करायला हवं. असं केल्याने नेमके काय फायदे होतात ते पाहूया..
मान स्ट्रेच करण्याचे फायदे
१. हा व्यायाम केल्याने मानेच्या भागातला ताण मोकळा होण्यास मदत होते. कारण यामुळे मानेच्या भागातील रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे मणक्याचा वरचा भाग, मेंदू यांनाही बरे वाटते.
२. हा व्यायाम करताना आपण दिर्घ श्वास घेतो आणि तो हळूहळू सोडतो. यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढण्यासही मदत होते.
३. मान काही वेळ वर करून आकाशाकडे पाहिल्याने मेंदूलाही चांगल्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो. त्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत होते.
४. हा व्यायाम नियमितपणे केल्यास पाठीच्या मणक्यालाही फायदा होतो. त्यामुळे बॉडी पोश्चर सुधारण्यासही मदत होते.
Web Summary : Feeling stressed? Looking at the sky for five minutes can relieve tension. This simple exercise stretches the neck, improves blood circulation, strengthens lungs, and enhances posture. Experts recommend doing it ten times daily for stress reduction and better sleep.
Web Summary : तनाव महसूस कर रहे हैं? पाँच मिनट तक आसमान देखने से तनाव दूर हो सकता है। यह सरल व्यायाम गर्दन को खींचता है, रक्त परिसंचरण में सुधार करता है, फेफड़ों को मजबूत करता है और आसन को बेहतर बनाता है। विशेषज्ञ तनाव कम करने और बेहतर नींद के लिए इसे दिन में दस बार करने की सलाह देते हैं।