Plank For Belly Fat : जास्तीत जास्त महिला आजकाल त्यांच्या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे चिंतेत असतात. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी चुकीची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे वाढते. अशात महिला पोटावरील चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. रोज काही तास पायी चालतात. पण केवळ पायी चालून पोटावरील चरबी कमी होणार नाही. त्यासाठी काही परफेक्ट एक्सरसाईज करणंही महत्वाचं ठरतं. अशीच एक एक्सरसाईज आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या एक्सरसाईजची तुम्हाला सगळ्यात जास्त मदत होईल. ही एक्सरसाईज म्हणजे प्लॅंक. चला जाणून घेऊ या एक्सरसाईजचे फायदे आणि करण्याची पद्धत.
प्लॅंकमुळे बेली फॅट बर्न होतं
वाढलेलं पोट आत घेण्यासाठी किंवा फ्लॅट करण्यासाठी प्लॅंक ही एक्सरसाईज सगळ्यात बेस्ट मानली जाते. या एक्सरसाईजच्या मदतीनं पोटाच्या आजूबाजूच्या मांसपेशी सक्रिय होतात. जर शरीर पूर्णपणे फिट ठेवायचं असेल तर ही प्लॅंक एक्सरसाईज नियमितपणे करायला हवी. ही एक्सरसाईज कशी करावी, याचा एक व्हिडीओ आम्ही खाली देत आहोत. हा व्हिडीओ नवी सुरूवात करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
संतुलन महत्वाचं
बेली फॅट बर्न करायची असेल किंवा शरीर फिट ठेवायचं असेल तर प्लॅंक एक्सरसाईजमध्ये संतुलन चांगलं असलं पाहिजे. फिटनेस एक्सपर्टनुसार, प्लॅंक पोजिशनमध्ये जेवढा जास्त वेळ तुम्ही थांबू शकाल, तेवढा जास्त फायदा होतो.
किती वेळ करावी ही एक्सरसाईज?
नव्यानं सुरूवात करणाऱ्या महिलांनी ही एक्सरसाईज साधारण ६० सेकंदासाठी करावी. हळूहळू ही वेळ वाढवा. थोड्या थोड्या वेळानं तीन ते चार वेळा ही एक्सरसाईज करावी. जर रोज ही एक्सरसाईज केली तर तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल.
कोणत्याही एक्सरसाईज असो त्यांचा फायदा ती एक्सरसाईज योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळेवर केल्यानं होतो. प्लॅंक करताना नेहमी पोजिशनकडे लक्ष द्या. जर तुम्ही पोजिशनमध्ये काही गडबड केली तर याचा प्रभावही कमी होईल. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ बघावा.