Join us

नवरात्रीच्या उपवासात पाणी कमी पिता? चेहऱ्यावर पडू शकतो गंभीर परिणाम, पाहा काय करावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:00 IST

Navratri Fasting Tips : उपवास करताना भलेही आपण काही खाऊ शकत नाही. पण पाणी पिणं फार गरजेचं असतं. जर पाणीही कमी पित असाल तर गंभीर परिणाम होतात.

Navratri Fasting Tips : आपण सगळे ज्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतो तो नवरात्री उत्सव (Navratri 2025) सुरू झाला आहे. या उत्सवादरम्यान लोक मनोभावे उपवास करून देवीची पूजा करतात. खासकरून महिला अधिक उपवास करतात. सतत 9 दिवस उपवास (Navratri Fasting) करणं काही सोपं काम नाही. त्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. अनेक महिलांना कमजोरी आणि चक्कर येणे अशा समस्या जाणवतात. आता उपवास करताना भलेही आपण काही खाऊ शकत नाही. पण पाणी पिणं फार गरजेचं असतं. जर पाणीही कमी पित असाल तर काय गंभीर परिणाम होतात हे आज आपण पाहणार आहोत. तसेच याचा चेहऱ्यावर काय प्रभाव पडतो हेही पाहुयात.

उपवासाआधीची तयारी

नवरात्रीमध्ये उपवास करताना आधीच काही तयारी केली पाहिजे. यासाठी इम्यूनिटी वाढणारं जेवण आणि भरपूर पाणी प्यायला हवं. जर आधीच आपण या गोष्टी करत असाल तर काही समस्या होणार नाही. पण जर पौष्टिक काही खात नसाल आणि भरपूर पाणी पित नसाल तर गंभीर समस्या होऊ शकतात.

पाणी पिणं जास्त गरजेचं का?

उपवास आपण निरंकार केला असेल, काहीच खात नसाल तर शरीराची एनर्जी कमी होते आणि शरीरात अनेक बदल बघायला मिळतात. महत्वाची बाब म्हणजे याच दिवसांमध्ये शरीराला पाण्याची अधिक गरज असते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरातून किमान पाच ते सात ग्लास पाणी प्यायला हवे. दर तासाला एक ग्लास पाणी पित असाल तर आपल्याला भूकही लागणार नाही आणि कमजोरी सुद्धा जाणवणार नाही. सतत एक एक घोट पाणी पित रहाल तर अधिक चांगलं.

पाणी कमी प्याल तर काय होईल?

उपवास करत असताना शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडतं, ज्यामुळे चक्कर येतात आणि सतत थकवा जाणवतो. लागोपाठ 9 दिवस असं केल्यानं तब्येत बिघडू शकते. त्यामुळे सतत थोडं थोडं पाणी पित राहणं फार गरजेचं आहे. पाणी प्याल तर पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतील.

त्वचेवर दिसतो फरक

त्वचा जर हेल्दी ठेवायची असेल तर पाणी फार गरजेचं असतं. जे लोक भरपूर पाणी पितात त्यांची त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसते. उपवासादरम्यान चेहरा डल होतो, कारण अनेकजण पाणी कमी पितात. या दिवसात भरपूर पाणी पिऊन त्वचा चांगली ठेवू शकता.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स