lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ७ चुकांमुळे सुटते पोट, वाढते कंबर; पोट कमी करायचं तर हा घ्या सोपा बिनकष्टाचा उपाय

७ चुकांमुळे सुटते पोट, वाढते कंबर; पोट कमी करायचं तर हा घ्या सोपा बिनकष्टाचा उपाय

Natural Home Remedies To Reduce Belly Fat : पोट सुटते, कंबरेचा भाग वाढतो कारण ७ साध्या चुका, पोट कमी करण्याचा पाहा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2023 06:11 PM2023-12-27T18:11:45+5:302023-12-27T18:12:25+5:30

Natural Home Remedies To Reduce Belly Fat : पोट सुटते, कंबरेचा भाग वाढतो कारण ७ साध्या चुका, पोट कमी करण्याचा पाहा सोपा उपाय

Natural Home Remedies To Reduce Belly Fat | ७ चुकांमुळे सुटते पोट, वाढते कंबर; पोट कमी करायचं तर हा घ्या सोपा बिनकष्टाचा उपाय

७ चुकांमुळे सुटते पोट, वाढते कंबर; पोट कमी करायचं तर हा घ्या सोपा बिनकष्टाचा उपाय

शरीराच्या कोणत्या भागात सर्वात हट्टी चरबी दिसून येते? याचे उत्तर कदाचित तुम्हालाही माहित असेल. सुटलेलं ओटीपोट आणि वाढलेल्या कंबरेच्या साईजमुळे बरेच जण त्रस्त आहेत. मुख्य म्हणजे शरीर सडपातळ पण ओटीपोट आणि कंबरेच्या घेरामुळे शरीर बेढप दिसू लागते. वजन कमी करण्यासाठी सध्या बाजारात विविध प्रकारचे फंडे उपलब्ध आहेत. पण प्रत्येक फंडे आपली चरबी घटवण्यासाठी मदत करेलच असे नाही (Weight Loss Tips). आजकाल बाजारात स्लिमिंग मेडिसिन देखील उपलब्ध आहेत. ज्याचे फायद्यांपेक्षा जास्त तोटे आहेत. इन्स्टंट उपायांपेक्षा आपण नैसर्गिक उपायांनी देखील ओटीपोट आणि कंबरेचा घेर कमी करू शकता.

यासंदर्भात, 'मिस इंडिया स्पर्धकांना प्रशिक्षण देणाऱ्या आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी सांगतात, 'ओटीपोट कमी करणे सोपे नाही. ओटीपोट कमी करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचं असेल तर, ७ उपाय नियमित करा. फरक नक्की पडेल'(Natural Home Remedies To Reduce Belly Fat).

नियमित एक तास ब्रिस्क वॉक

ब्रिस्क वॉक केल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल. ब्रिस्क वॉक केल्याने फक्त ओटीपोट कमी होत नसून, संपूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. शिवाय शरीरातील इतर आजारही दूर राहतात. यासह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. सुरुवात १५ मिनिटांपासून करा. नंतर हळूहळू १ तासावर या. निदान १५ मिनिटे चाला.

सलमान खानचं डाएट सिक्रेट, पन्नाशीनंतरही फिट रहायचं म्हणून त्यानं स्वीकारला अनोखा फिटनेस फॉर्म्युला

कार्ब्सयुक्त पदार्थ कमी खा

आपण नियमित नकळत हाय फॅट आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खातो. पण दररोज हे पदार्थ खाणं चुकीचे आहे. कार्ब्सयुक्त पदार्थ खाणं बंद करू नका. पण मर्यादित प्रमाणात खा. फॅट्स आणि कार्ब्सयुक्त पदार्थ शरीराला हवे, पण जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे प्रमाण ठरवून खा.

प्रोटीनयुक्त पदार्थ खा

आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. जेव्हा आपण प्रोटीनयुक्त पदार्थ खातो तेव्हा, पोट दीर्घकाळ भरलेले राहते. लगेच भूक लागत नाही. शिवाय उलट-सुलट पदार्थ खाण्याची इच्छाही कमी होते. त्यामुळे नेहमी सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त पदार्थांनी करा. यामुळे ओटीपोट कमी करण्यास मदत मिळेल.

फायबरयुक्त पदार्थ खा

आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोट योग्य वेळी साफ होईल आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. शिवाय आतड्यांसंबंधी समस्याही कमी होईल.

व्हिटॅमिन डीच्या लेव्हलकडे लक्ष ठेवा

बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असते. यामुळे ब्लोटिंग आणि वॉटर रिटेंशनसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय ब्लड रिपोर्ट्स देखील बरोबर येत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या लेव्हलकडे लक्ष ठेवा. यासाठी सकाळी सूर्यप्रकाश घ्या. त्यानंतर दिवसभर अशा पदार्थांचे सेवन करा ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही.

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

स्ट्रेस कमी करा

स्ट्रेसमुळे वजन वाढते? आता तुम्ही म्हणाल स्ट्रेसमुळे वजन कसे वाढू शकते. तर हो, स्ट्रेस घेतल्यामुळे केस गळणे, त्वचेच्या निगडीत समस्या यासह वजन देखील वाढू शकते. हार्मोनल असंतुलनामुळे आपण स्ट्रेस इटिंग करतो. अशावेळी आपण काय आणि किती प्रमाणात पदार्थ खात आहोत, याची कल्पना आपल्याला नसते. त्यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय स्ट्रेसमुळे इतरही आजार छळतात.

जेवण करण्याची वेळ निश्चित करा

बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे आपण वेळेवर जेवण करत नाही. जेवणाच्या वेळा चुकल्यानंतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.. शिवाय जेवणातील फॅट्स ओटीपोटात जाऊन जमा होते. ज्यामुळे वजन कमी करणं कठीण होऊन जाते.

Web Title: Natural Home Remedies To Reduce Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.