Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ तास उपाशी आणि ३५ वर्षांपासून सकाळची एक सवय! दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या 'एव्हरग्रीन' फिटनेसचं रहस्य- पाहा डाएट प्लान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 16:51 IST

South Indian superstar fitness motivation: Nagarjuna morning habits for health: नागार्जुन यांचा हा 'मॅजिकल फिटनेस फॉर्म्युला' नेमका आहे तरी काय, ते समजून घेऊया.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'मन्मधुडू' म्हणजेच अक्किनेनी नागार्जुन यांच्याबद्दल बोलताना सर्वात आधी डोळ्यांसमोर येतो तो त्यांचा 'एव्हरग्रीन लूक'. वयाची ६४ वर्षे ओलांडली असली, तरी नागार्जुन यांना पाहिल्यावर ते आजही विशी-तिशीतील कोणत्याही अभिनेत्याला फॅशन आणि फिटनेसच्या बाबतीत तगडी टक्कर देतात. (Nagarjuna morning habits for health)आता आपल्याला वाटतं, फिट राहायचंय म्हणजे जिममध्ये जाऊन तासन्तास घाम गाळला की काम झालं. पण नागार्जुन म्हणतात, केवळ जिम पुरेसं नाही; तर तुमचा आहार आणि शिस्त सर्वात महत्त्वाची आहे.(South Indian superstar fitness motivation) त्यांचा हा फिटनेस काही एका रात्रीत आलेला नाही, तर मागच्या ३५ वर्षांच्या मेहनतीचं हे फळ आहे. नागार्जुन यांचा हा 'मॅजिकल फिटनेस फॉर्म्युला' नेमका आहे तरी काय, ते समजून घेऊया. 

सावळ्या मुलींना खुलून दिसतात ९ रंग, सुंदर कातील दीपिका पादुकोणसारखा लूक!

नागार्जुन यांच्या फिटनेसचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे 'फास्टिंग'. ते दिवसातले १४ तास काहीही खात नाहीत. त्यांचं एक साधं गणित आहे, रात्री ७ च्या आत जेवण संपवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९-१० वाजेपर्यंत काहीही खायचं नाही. यामुळे शरीराला अन्न पचवायला आणि आतून दुरुस्ती करायला भरपूर वेळ मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावर जे नैसर्गिक तेज दिसतं, त्याचं खरं गुपित हेच आहे. 

गेल्या ३५ वर्षांपासून नागार्जुन यांचा एक नियम जो कधीच बदलला नाही तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर भरपूर कोमट पाणी पिणे. यामुळे शरीरातील सगळी घाण (Toxins) बाहेर पडते. त्यानंतर ते योगा आणि ध्यान (Meditation) करतात, ज्यामुळे त्यांना मानसिक शांतता मिळते. त्यानंतर ते कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगही करतात. शूटिंगमध्ये कितीही बिझी असले, तरी त्यांचा व्यायाम कधीच चुकत नाही.

नागार्जुन म्हणतात, जसं वय वाढतं, तसं शरीर बदलायला लागतं. त्यामुळे कोणतेही पदार्थ घाईघाईत खाऊ नका. नागार्जुन यांच्या नाश्त्यात प्रोटीन आणि ताजी फळं असतात. दुपारच्या जेवणात डाळ, पालेभाज्या आणि अगदी थोडा भात किंवा चपाती असते. बाहेरचं खाण्यापेक्षा ते नेहमी घरच्या जेवणालाच पसंती देतात. ते आठवड्यातून ५ दिवस न चुकता जिममध्ये वेट ट्रेनिंग आणि कार्डिओ करतात. पण रोज तेच तेच करून कंटाळा येऊ नये म्हणून ते कधी पोहायला जातात तर कधी टेनिस खेळतात. 

नागार्जुन म्हणतात, "मला गोड पदार्थ खूप आवडतात, मी चॉकलेट खातो. रविवारी मी माझ्या व्यायामाच्या आणि नित्यक्रमाच्या नियमात बदल करतो. हा दिवस माझ्यासाठी 'चीट डे' असतो. ते म्हणतात की, जर आपल्याला आरोग्याच्या काही समस्या नसतील, तर आपण हे आठवड्यातून एकदा करू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagarjuna's Evergreen Fitness: 14-Hour Fasting and 35-Year Morning Ritual

Web Summary : South Indian superstar Nagarjuna maintains his youthful look through 14-hour fasting, a 35-year morning routine of drinking warm water, yoga, and varied workouts. He emphasizes diet, discipline, and enjoys a cheat day, balancing healthy habits with occasional indulgences for sustained fitness.
टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्ससेलिब्रिटी