Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिमला जाण्याचा, व्यायामाचा कंटाळा येतो? मग घरीच करा 'हे' एक सोपं काम, लगेच कमी होईल पोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:02 IST

Exercise for Belly Fat : लठ्ठपणाने तर जास्तीत जास्त लोक वैतागलेले आहेत. अशात जे जिमला जात नाहीत, त्यांच्यासाठी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक सोपा उपाय घरातच आहे.

Exercise for Belly Fat : आपण सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरकडून म्हणा, हेल्थ एक्सपर्टकडून म्हणा किंवा फिटनेस ट्रेनरकडून म्हणा हेच ऐकत असतो की, आजकाल वाढलेल्या आजारांचं मुख्य कारण सुस्त जीवनशैली आहे. लठ्ठपणाने तर जास्तीत जास्त लोक वैतागलेले आहेत. काही लोक जिमला जातात, तर काहींना जिम वगैरेमध्ये काही इंटरेस्ट नसतो. अशात जे जिमला जात नाहीत, त्यांच्यासाठी पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक सोपा उपाय घरातच आहे. तोच आज आपण पाहणार आहोत. हा उपाय म्हणजे जर महिला किंवा पुरुष घरातील लादी खाली बसून पुसतील, तर त्यांना पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगळी मेहनत घेण्याची गरजच नाही.

बसून लादी पुसण्याचे फायदे

चरबी वितळू लागते

जेव्हा आपण लादी पुसतो, तेव्हा शरीर सतत झुकतं आणि ताकद लावावी लागते. त्यामुळे शरीरावर दाब येतो आणि पोटाभोवती जमा झालेली चरबी वितळू लागते. पोटावर दिसणाऱ्या चरबीच्या लेयर्स हळूहळू कमी होतात आणि वितळलेली चरबी शरीरातून बाहेर निघू लागते.

कॅलरी लवकर बर्न होतात

बसून लादी म्हणजे फरशी पुसल्याने शरीराच्या विविध स्नायूंवर काम होतं, त्यामुळे कॅलरी लवकर बर्न होतात. या प्रक्रियेदरम्यान शरीरात उष्णता निर्माण होते, हृदय आणि इतर अवयव अधिक कार्यशील होतात, आणि त्यामुळे चरबीचं इंधन म्हणून वापर होऊ लागतो. यामुळे पोटाची चरबी कमी होण्याचा वेग वाढतो.

बेली फॅट वाढत नाही

बसून लादी पुसणं म्हणजे एकप्रकारे पूर्ण शरीराची हलकी व्यायामक्रियाच आहे. त्यामुळे बेली फॅट वाढत नाही आणि वजन नियंत्रित राहतं. जर आधीच पोटावर चरबी असेल, तर ती हळूहळू कमी होऊ लागते; आणि ज्यांचं पोट सपाट आहे, त्यांचं वजन स्थिर राहतं. ही क्रिया पोटाच्या खालच्या भागातील चरबी कमी करण्यात, तसेच हात, कंबर आणि पेल्विक भाग मजबूत करण्यात मदत करते. याशिवाय, हातांची पकड आणि स्नायूंची ताकद वाढते.

एकंदर काय तर घरात बसून लादी पुसणं हा केवळ स्वच्छतेसाठी नव्हे तर शरीरासाठीही उत्कृष्ट नैसर्गिक व्यायाम आहे. नियमितपणे हे केल्यास पोटाची चरबी कमी होते, शरीर लवचिक आणि सक्रिय राहते, आणि तुम्ही कोणत्याही अतिरिक्त जिमशिवाय फिट राहू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Tired of Gym? Lose Belly Fat by Mopping Floors at Home!

Web Summary : Skip the gym! Mopping floors at home burns calories, melts belly fat, and strengthens muscles. A simple, effective workout for a fitter you.
टॅग्स :वेट लॉस टिप्सव्यायामफिटनेस टिप्स