मूग डाळ (Moong Dal) एक हलका आणि पौष्टीक आहार आहे. सुप आणि पोषक तत्वांनी परीपूर्ण मूग डाळीच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात. यात व्हिटामीन्स, फायबर्स, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. या डाळीत आयर्नसुद्धा असते. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असते त्यांनी आपल्या आहारात मूग डाळीच्या खिचडीचा समावेश करायला हवा. (Mix These Ingredient In Moong Dal Khichdi To Get Maximum Benefits)
मूग डाळीची खिचडी करताना तुम्ही यात टोफू मिसळू शकता. टोफूमुळे याचे आरोग्यदायी फायदे अधिकच वाढतात. याव्यतिरिक्त मूग डाळीच्या खिचडीत काही पदार्थ मिसळून तुम्ही याची पोषक तत्व वाढवू शकता. (Eat Dal Khichdi In These Way To Get Maximum Benefits)
मूग डाळीच्या खिचडी काय मिसळावे?
मूग डाळीच्या खिचडीत तुम्ही तूप मिसळायला हवं. यामुळे शरीरातील हेल्दी फॅट्सचे प्रमाण वाढते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय संपूर्ण दिवसभर शरीर एनर्जेटीक राहतं.तूप आणि टोफू मिक्स करण्याशिवाय यात आलं, हळद, जीरं, ताज्या भाज्या मिक्स केल्यास मूग डाळीची खिचडी अधिकच पौष्टीक बनते.
मूग डाळीची खिचडी खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Khichdi)
ही खिचडी खाल्ल्यानं तुमचं वजन नियंत्रणात राहतं. ज्यामुळे शरीरातील गुड फॅट्सचे प्रमाण वाढते. पोट हलकं राहतं. पचनक्रिया सुधारते. याशिवाय मूगाच्या डाळीत प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट् असतात हार्ट हेल्थसाठी मूगाची डाळ फायदेशीर ठरते. इतंकच नाही तर या खिचडीनं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मूग डाळीतील व्हिटामीन्स, मिनरल्स आणि एंटी ऑक्सिडेंट्स इम्यून सिस्टीम मजबूत ठेवतात. यामुळे शरीराचे संक्रमण आणि आजारांशी लढण्याशी क्षमता वाढते.