मिलिंद सोमणचे नाव घेतले की डोळ्यासमोर लगेच उभे राहते एक तंदुरुस्त, आत्मविश्वासू आणि सदैव ऊर्जेने भरलेले व्यक्तिमत्व. आज वयाच्या ६०व्या वर्षीही त्यांच्या समोर मोठमोठाले जीम करणारे अभिनेते फिके पडतात. वय वाढत असताना फिटनेसकडे अधिक दुर्लक्ष करणारी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात, पण मिलिंद सोमण त्याच्या उलट आहेत. (Milind Soman, who looks hot even at the age of 60, shares his diet plan, see what to eat and what not to eat)आजही ते तितक्याच जोमानं धावताना, पोहताना, सायकल चालवताना आणि स्वतःच्या जीवनशैलीतून फिट राहताना दिसतात. त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये ते कसे फिट राहावे काय खावे काय टाळावे याबद्दल सांगत असतात.
त्यांचा प्रवास मॉडलिंगने सुरु झाला असला तरी त्यांची ओळख कालांतराने एक फिटनेस आयकॉन म्हणून पक्की झाली. शिस्त, अॅथलेटिक दृष्टिकोन, आणि मानसिक तंदुरुस्तीला दिलेले महत्त्व या सगळ्यामुळे ते तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. साध्या सवयी आणि सोपे व्यायाम करुनही फिट राहता येते. तसेच आहारात थोडा बदल करणे गरजेचे आहे असे ते नेहमी सांगतात. पिंकविला सोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की त्यांना काय खायला आवडते आणि कोणती फळे खावीत. जाणून घ्या त्यांचे सोपे डाएट.
फळे खाणे सगळ्यात मस्त आणि चविष्ट उपाय आहे. नाश्त्यात फळे खावीत. एक अख्खी पपई खा. अर्धे कलिंगड खाऊ शकता. रोज केळी खायची. केळी वजन आणि आरोग्य दोन्हीसाठी चांगली असतात. हंगामी फळे खायला अजिबात विसरु नका. त्यात पोषण जास्त असते. मुसली, सुकामेवा असे पदार्थ नाश्त्यात असावे.
दुपारी आणि रात्री जेवणात फार काही वेगळे करायला हवे असे नाही. आपला साधा वरण भात, भाजी पोळी टिपिकल महाराष्ट्रीय आहार जसा असतो तसाच ठेवावा. तेल जास्त न वापरता जरा कमी वापरायचे. बाकी भाज्या भरपूर खा. मिलिंद सोमणने सांगितले की त्यांना मराठमोळे पदार्थ सगळ्यात जास्त आवडतात. त्यांच्या आहारात तेच असतात. त्याऐवजी बंगाली पदार्थ , आसामी पदार्थही आवडतात. पण ते शुद्ध शाकाहारी आहार घेतात. त्यातूनही पोषण मिळते फक्त काय किती खावे हे कळले पाहिजे. मिलिंद सोमणने सांगितलेला आहार रोजच्या जीवनशैलीत नक्कीच फिट होणारा आहे.
