Join us

Milind soman walks ramp : २६ वर्षांनी रॅम्प वॉकमध्ये झळकला मिलिंद सोमण; त्याला पाहताच भर इवेंटमध्ये मलायका म्हणाली.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 13:08 IST

Milind soman walks ramp : मिलिंद सोमणचा असा लूक पाहून अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध मॉडेल मलायका अरोराही चांगलीच चकीत झाली. सोशल मीडियावर मिलिंदला पाहिल्यानंतर मलायकाच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

प्रसिद्ध टेलिव्हिजन शो सुपरमॉडल ऑफ ईयर २ चा नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यात सुपरफिट अभिनेत्रा मिलिंद सोमण रॅम्प वॉक करताना दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये मिलिंद सोमणसह तर स्पर्धक पोज देत आहेत. मिलिंद सोमणचा असा लूक पाहून अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध मॉडेल मलायका अरोराही चांगलीच चकीत झाली. सोशल मीडियावर  मिलिंदला पाहिल्यानंतर मलायकाच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

मिलिंद सोमणला इतक्या वर्षांनी रॅम्प वॉक करताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जवळपास २६ वर्षानंतर मिलिंदनं रॅम्प वॉक केला आहे. पत्नी अंकीतानंसुद्धा मिलिंदच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. अंकितानं ... आणि २६ वर्षांनी पुन्हा एकदा..... असं कॅप्शन दिलं आहे.  सोशल मीडियावर मिलिंदच्या धोतराच्या लूकची तुफान चर्चा होत आहे.   पोटात गॅस झाला म्हणून ती दवाखान्यात गेली; अन् समजलं ८ महिन्यांची गरोदर आहे, मग घडलं असं काही..

२६ वर्षांपूर्वी मिलिंद सोमण मेड इन इंडिया गाण्यावर अश्याच लूकमध्ये दिसला होता. धोतर नेसून गायिका अलीशा चिनॉयसोबत रोमांस करताना दिसून आला होता. मिलिंद सोमणची पत्नी अंकीतानं या फोटोवर कमेंट केली आहे. 'नेहमी इतकं हॉट कसं दिसायचं?'  मूल होण्यासाठी तिनं ऑनलाईन शुक्राणू मागवले अन् गरोदर झाली; मग घडलं असं काही...

शर्टलेस आणि धोतीमधील मिलिंद सोमणचा हा लूक मलायका अरोराप्रमाणेच चाहत्यांकडूनही पसंत केला जात आहे. मिलिंदची ही स्टाईल पाहून मलायका अरोरा मोठ्याने ओरडते 'व्वा लुक'. हा व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

आजकाल हे दोन्ही स्टार्स रिअॅलिटी शो 'मॉडेल ऑफ द इयर' सीझन 2 मध्ये एकत्र दिसत आहेत. याआधीही दोघांनी अनेक शो आणि मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे. मलायकाबद्दल बोलायचे झाले तर मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात राहते. 'मुन्नी बदनाम हुई', 'छैय्या छैय्या' सारख्या अनेक हिट गाण्यांनी मलायका अरोराला लोकप्रिय केले आहे. 

टॅग्स :मिलिंद सोमण बॉलिवूडफॅशनसेलिब्रिटी