Join us

तासंतास कशाला? चरबी कमी करण्यासाठी रोज करा मायक्रो वॉकिंग, जाणून योग्य पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 10:25 IST

Weight Loss Tips : पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तासंतास जिममध्ये वर्कआउट करण्याची गरज नाही.

Weight Loss Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात फिट आणि निरोगी राहणं सगळ्यांसाठीच एक चॅलेंज ठरत आहे. कामाची वाढती वेळ, प्रवासात जाणारा वेळ यामुळे जे लोक जिम जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी फिट राहणं तर आणखी अवघड होतं. त्यामुळे पोटाचा घेर दिवसेंदिवस वाढत राहतो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तासंतास जिममध्ये वर्कआउट करण्याची गरज नाही. चालण्याच्या काही सोप्या टिप्स फॉलो करूनही तुम्ही चरबी कमी करू शकता. 

सामान्यपणे जेवण झाल्यावर बरेच लोक काही मिनिटं का होईना चालतात (Walking). यानं ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते, मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि पचनक्रियाही चांगली होते. अशात पायी चालण्याची मायक्रो वॉकिंग एक वेगळी पद्धत जर तुम्ही रोज फॉलो केली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

काय आहे मायक्रो वॉकिंग? (Micro Walk)

आता तुम्ही म्हणाल की, वॉकिंग तुम्ही रोजच करता, पण ही मायक्रो वॉकिंग काय आहे. तर जर तुमच्याकडे चालण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही दिवसभरात छोट छोट वॉक करू शकता. म्हणजे सकाळी, दुपारच्या जेवणानंतर, कामाच्या मधेमधे 5 ते 10 मिनिटं वॉक आणि सायंकाळी वॉक. वॉकिंगला तुम्ही जर विभागलं तर तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट राहतं आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करतं.

prevention.com वर प्रकाशित एका रिपोर्टनुसार, ज्या लोकांना एकाच जागी बसून जास्त वेळ काम करावं लागतं, त्यांच्यासाठी मायक्रो वॉकिंग खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेऊन तुम्ही 10 ते 30 सेकंद वॉक करू शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला खूप लांब चालत जाण्याचीही गरज नाही.

जेवणानंतर वॉक करण्याचे फायदे

जेवण केल्यानंतर 10 ते 15 मिनिटं वॉक केल्यानं पचनास मदत मिळते. ब्लड शुगर नियंत्रित राहते. या सवयीनं इंसुलिन सेंसिटिविटी वाढते आणि फॅट स्टोरेज कमी होतं. त्याशिवाय झोपेच्या क्वालिटीमध्येही सुधारणा होते. इतकंच नाही तर वॉक केल्यानं तणावही कमी होतो.

वॉकिंगसोबतच तुम्ही चालता-फिरता काही हलके व्यायामही करू शकता. या व्यायामांनी वजन तर कमी होईलच, सोबतच स्नायू मजबूत होतील, ब्लड सर्कुलेशन सुरळीत होईल, मानसिक आरोग्य चांगली राहील आणि हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स