Join us  

मंदिरा बेदीनं शेअर केला ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याचा जबरदस्त उपाय; पाहा वर्कआऊट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:43 PM

Mandira Bedi shares solution to increase oxygen : मंदिराच्या शरीरयष्टीनं अनेकांना प्रेरित केलं आहे. मंदिरानं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ठळक मुद्देतिनं आपल्या फिटनेसमुळे लाखो लोकांना आकर्षित केलं आहे. मंदिरा आपला फिटनेस मेटेंन ठेवण्यासाठी रोज वर्क आऊट करते. सोशल मीडियावर मंदिरा नेहमीच आपले फिटनेस व्हिडीओज शेअर करत असते. 

कोरोनाकाळात  अनेकांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर काहींना ऑक्सिजन अभावी श्वसनाच्या आजरांचा सामना करावा लागत आहे. ऑक्सिजन लेव्हल नियंत्रणत ठेवण्यासाठी काय काय करता येईल. याचा शोध जास्तीत जास्त लोकांकडून घेतला जात आहे. दरम्यान मॉडेल, अभिनेत्री मंदिरा बेदी आपल्या फिटनेसवरून तुफान चर्चेत असते. तिनं आपल्या फिटनेसमुळे लाखो लोकांना आकर्षित केलं आहे. मंदिरा आपला फिटनेस मेटेंन ठेवण्यासाठी रोज वर्क आऊट करते. सोशल मीडियावर मंदिरा नेहमीच आपले फिटनेस व्हिडीओज शेअर करत असते. 

मंदिराच्या शरीरयष्टीनं अनेकांना प्रेरित केलं आहे. मंदिरानं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ज्यात ती वर्कआऊट करताना दिसून येत आगे. या प्रकारचा वर्कआऊट करून तुम्ही आपली ऑक्सिजन लेव्हल वाढवू शकता तसंच या व्यायाम प्रकारांनी मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते. 

मंदिरा बेदीनं सांगितले की, तुम्ही कोणत्याही ठिकाणी वर्कआऊट करू शकता. वर्कआऊटसाठी तिनं बाथरूमची निवड केली आहे. सोमवारी शेअर केलेल्या या व्हिडीओत मंदिरा चक्रसन करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मंदिरानं बॅकबेंड योगा पोज दिली आहे. या व्हिडीओवर सगळ्यांनीच लाईक्सचा वर्षाव केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'यामुळे तुमची ऑक्सिनजन लेव्हल वाढते. तसंच ताण तणावही कमी होतो.  तुमची पाठ, कंबर, मजबूत होते. मनाला आनंद मिळतो. मंदिराच्या फॅन्सनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केला आहे.' मंदिराच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरनं म्हटलं आहे की,  तुम्हाला पाहूनही ऑक्सिजन लेव्हल वाढली आहे.  तुम्ही खूपच फिट, शानदार आहात असं म्हणत कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

मंदिरा दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी ओलांडली आहे. या वयातही मंदिरा बेदीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे.

मंदिरा नेहमीच सोशल मीडियावर आपले फिटनेस व्हिडीओज शेअर करत असते. फिट राहण्यासाठी जिमला जाण्याबरोबरच योगा आणि स्विमिंगसुद्धा करते. मंदिरा बेदीने इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं तेव्हा फक्त ती 20 वर्षांची होती. या क्षेत्रात आपलं विशेष स्थान मिळविण्यासाठी धडपडत होती.  मंदिराने 1994 मध्ये टीव्ही सीरियल 'शांती' पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेत मंदिराला एक खास ओळख मिळाली. इतकेच नाही तर मंदिरा हे नाव घराघरात पोहोचले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

प्रेग्नेंट असल्याचे समजताच दु:खी झाली होती मंदिरा

मंदिर बेदीचा इथंवरचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. काही वर्षापूर्वी एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला की वयाच्या 39 व्या वर्षी ती आई झाली. 2011 मध्ये तिने आपल्या मुलास जन्म दिला. ती ज्या प्रोजेक्टसाठी काम करत होती त्यांच्यासोबत तिचा करार झाला होता. तिला भीती होती की जर ती प्रेग्रेंट राहिली तर तिचं करिअर संपेल. पुढे ती म्हणाली, मनोरंजन जगात महिलांचा करिअर जास्त मोठं नसतं. टिव्ही आणि सिनेमांमध्ये जास्त काम करणाऱ्या महिलांबाबत मला असुरक्षिततेची भावना होती. माझ्या पतीमुळे आमचा संसार यशस्वी होऊ शकला.  

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्समंदिरा बेदी