lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

Fitness Tips: अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच एक पोस्ट साेशल मिडियावर शेअर केली असून याद्वारे तिने पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. बघा नेमका कशा पद्धतीचा व्यायाम करते आहे मलायका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 12:46 PM2022-03-23T12:46:14+5:302022-03-23T12:47:06+5:30

Fitness Tips: अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) नुकतीच एक पोस्ट साेशल मिडियावर शेअर केली असून याद्वारे तिने पुन्हा एकदा तिचा जबरदस्त फिटनेस दाखवला आहे. बघा नेमका कशा पद्धतीचा व्यायाम करते आहे मलायका...

Malaika Arora showing her amazing fitness by doing splits in headstand position | शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

शीर्षासन घालून मलायकाने केले स्प्लिट आणि भन्नाट व्यायाम... बघा व्हायरल व्हिडिओ

Highlightsपंचेचाळिशीच्या आसपास पोहोचलेली मलायका अजूनही किती जबरदस्त फिट आहे, हेच तिच्या व्यायामावरून दिसून येते.

फिटनेसच्या बाबतीत बॉलीवूडमध्ये मलायकाच्या तोडीसतोड ठरणाऱ्या अभिनेत्री खूप कमी आहेत. त्यामुळेच तर जेव्हा केव्हा फिटनेसचा विषय निघतो, तेव्हा मलायकाचे नाव आवर्जून घेतलेच जाते. फिटनेसबाबत (fitness) मलायका काय सल्ला देणार, हे जाणून घेण्यासाठी तिचे अनेक चाहते उत्सूक असतात. त्यामुळेच तर सोशल मिडियावरील तिच्या फिटनेस पोस्ट नेहमीच जबरदस्त व्हायरल होत असतात. (Malaika Arora doing yoga)

 

आताही मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर (instagram share) केली आहे. पंचेचाळिशीच्या आसपास पोहोचलेली मलायका अजूनही किती जबरदस्त फिट आहे, हेच तिच्या व्यायामावरून दिसून येते. शिल्पा शेट्टी म्हणते, व्यायाम करायला वेळच मिळत नसेल तर झटपट करा Free Squats, ५ फायदे
या पोस्टमध्ये मलायका तिच्या फिटनेस ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करताना दिसते आहे. व्यायामासाठी तिने शीर्षासन हा सर्वात अवघड प्रकार निवडला आहे. पण एवढ्यावरच ती थांबलेली नाही. त्याच्याही पुढे जाऊन तिने त्यात splits हा आणखी एक अवघड व्यायाम प्रकार करण्याचा प्रयत्न् केला आहे. splits करण्यासाठी सगळ्यात आधी शिर्षासन (headstand position) उत्तम जमणे गरजेचे आहे, शिर्षासन जमल्यानंतर दोन्ही पाय एकमेकांपासून लांब केले जातात आणि पायातलं अंतर शक्य तेवढं वाढवलं जातं.

 

स्प्लिट्स केल्यानंतर स्वत:चा बॅलेन्स सांभाळणं आणखी कठीण होऊन जातं, पण मलायकाने मात्र हे उत्तम पद्धतीने जमवलं आहेे, स्प्लिट्स केल्यानंतर शिर्षासनाची पोझिशन असतानाच तिने दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवले, यानंतर तिचे शरीर आणि दोन्ही पाय यामध्ये ९० डिग्रीचा कोन तयार केला. मलायकाचा हा व्हिडिओ पाहताना तिच्या फिटनेसचे आणि व्यायामातल्या तिच्या सातत्याचे नक्कीच कौतूक वाटते. आता मलायकासारखे शीर्षासनातले स्प्लिट्स नाही जमले तरी साधे शीर्षासन करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. कारण नियमित शीर्षासन केल्यामुळे आरोग्याला पुढील प्रकारे लाभ होतात.

 

शीर्षासन करण्याचे फायदे (benefits of headstand position)
१. नियमित शीर्षासन केल्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो.
२. ज्यांना कायम डोकेदुखीचा त्रास असतो, त्यांना शीर्षासन केल्यामुळे फायदा होतो.
३. डोळ्यांसाठी देखील हा व्यायाम उत्तम आहे.
४. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी शीर्षासन उपयुक्त आहे.
५. खांदे, मान, पाठ, कंबर येथील स्नायूंना बळकटी देण्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे.
६. शीर्षासन केल्यामुळे पाठीचा कणाही मजबूत होतो.
 

Web Title: Malaika Arora showing her amazing fitness by doing splits in headstand position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.