lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! : तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, ३ उपाय करा-वजन राहील आटोक्यात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 04:26 PM2024-01-23T16:26:52+5:302024-01-23T16:27:44+5:30

Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! : तळकट पदार्थ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याचं टेन्शन सोडा, ३ उपाय करा-वजन राहील आटोक्यात..

Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It! | तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

तेलकट खाल्लं तरी वजन वाढणार नाही, लक्षात ठेवा ३ मुख्य गोष्टी, वाढलेलं वजनही उतरेल चटकन

वजन कमी (Weight Loss) करताना विशेष म्हणजे डाएटकडे लक्ष द्यावे लागते. व्यायामामुळे कॅलरीज बर्न होतात. पण उलट-सुलट पदार्थ खाल्ल्याने, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. व्यायामाचा कोणताच सकारात्मक परिणाम शरीरात दिसून येणार नाही. त्यामुळे वजन कमी करताना डाएटकडे विशेष लक्ष दिलेले बरे. पण असे देखील काही लोकं आहेत, ज्यांना चमचमीत पदार्थ खाल्ल्याशिवाय पोट आणि मन भरत नाही.

अशा लोकांना 'फुडी' असे म्हणतात. पण 'फुडी' लोकांना वजन कमी करताना नाकीनऊ येतात (Fitness Tips). जर आपण देखील 'फुडी' असाल, पण मन आणि पोटाला चिमटे न देता वजन कमी करायचं असेल तर, ३ टिप्स फॉलो करा. मनसोक्त खाल्ल्यानंतरही वजन कमी होईल(Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It!).

वजन कमी करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या?

थंड पाणी पिऊ नका

वजन कमी करताना पोषणतज्ज्ञ थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात. नियमित पाणी प्यायला हवे. पण थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होते. शिवाय पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी शरीराचे तापमान सामान्य ठेवायला हवे. त्यामुळे काहीही खाल्ल्यानंतर थंड पाणी पिणे टाळा. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी प्या. कोमट पाण्यामुळे तेलकट आणि जंक फूड पचायला सोपे जाते. पण खाण्याच्या अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे.

पायऱ्या जा चढत- वजन घटेल झरझर; पण वजन कमी करण्यासाठी किती मिनिटे पायऱ्यांचा व्यायाम करावा?

सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी हेल्दी ड्रिंक्स प्या

पिझ्झा किंवा बर्गरसोबत आपण सॉफ्ट ड्रिंक पितो. पण सॉफ्ट ड्रिंकमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्यामुळे आपण सॉफ्ट ड्रिंकऐवजी लिंबूपाणी, शिंकजी, ताक, लस्सी किंवा ग्रीन टी पिऊ शकता.

अनिल कपूरच्या चिरतारुण्याचं सिक्रेट काय? स्वत: अनिल कपूरनेच सांगितला सोपा-स्वस्त डाएट प्लॅन

डाएट प्लॅन तयार करा

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, वेट लॉस डाएट प्लॅन तयार करा. एक दिवस चीट डेसाठी ठेवा. आपण चीट डे ला आवडीचे पदार्थ खाऊ शकता. पण बाकीच्या दिवसांमध्ये जंक किंवा पॅक्जेड खाद्यपदार्थ खाऊ नका. जर आपण दिवसातून एकदा तळकट पदार्थ खात असाल तर, दुसऱ्या वेळेस हिरव्या भाज्या, कोशिंबीर, फळे आणि कडधान्ये खा. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजेयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय आरोग्य निरोगी राहते.

Web Title: Love Eating Junk Food - 3 Things You Must Eat Or Drink After Indulging In It!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.