Kangana Ranaut drinks water from silver tumbler: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे आणि कारण आहे तिची पाणी पिण्याची सवय. अलिकडे काही मुलाखतींमध्ये कंगना चांदीच्या ग्लासमधून पाणी पिताना दिसली. यावरून काही लोकांनी कंगनाला ट्रोलही केलं. तर मुलाखतींमध्ये कंगनानं चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचं कारणही सांगितलं आहे.
कंगनानं सांगितलं की, चांदीचा ग्लास तिला तिच्या मावशीनं गिफ्ट दिला होता. आयुर्वेदातही चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
आयुर्वेदात तांबे, माती आणि इतर धातुचा आपल्या आरोग्यावर होणाऱ्या प्रभावाबाबत सांगितलं आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या भांड्यात ठेवलेलं अन्न खाल्ल्यानं किंवा पाणी प्यायल्यानं आरोग्यावर चांगला प्रभाव पडतो. अशात जाणून घेऊ चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचे फायदे.
पित्तदोष कमी करते चांदी
कंगनानं एका पॉडकास्ट इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की, तिचा आयुर्वेदावर खूप विश्वास आहे. तिच्या शरीराची प्रकृती पित्त दोष असणारी आहे आणि चांदी शरीराला थंड ठेवत, शरीराचा टेम्प्रेचर कंट्रोल ठेवते. त्यामुळेच कंगना चांदीच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिते. कारण यानं पित्त दोष कमी करण्यास मदत मिळते. तसेच राग कंट्रोल ठेवण्यासाठीही चांदीच्या ग्लासमधून पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
वाढते इम्यूनिटी
चांदीच्या ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्यास आणखी एक फायदा शरीराला मिळतो. चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायल्यास शरीराची इम्यूनिटी मजबूत होते. अशाप्रकारे वेगवेगळे इन्फेक्शन आणि आजारांपासून शरीराचा बचाव होतो.
चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचे इतर फायदे
बॅक्टेरिया नष्ट होतात
चांदीमध्ये असे काही तत्व आढळतात जे बॅक्टेरिया नष्ट करून पाणी शुद्ध करतात. ज्यामुळे शरीराला बॅक्टेरिया फ्री ठेवण्यास मदत मिळते. चांदीमध्ये काही अॅंटी-एंजिग इफेक्ट्सही असतात, जे शरीराला निरोगी आणि तरूण ठेवण्यास मदत करतात.
पोटाचं आरोग्य चांगलं राहतं
जर तुम्हाला पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या नेहमीच होत असतील तर चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायल्यास समस्या दूर होऊ शकतात. चांदीच्या ग्लासमधून पाणी प्यायल्यास शरीरात रक्ताची कमतरता होणं रोखलं जाऊ शकतं.
बॉडी डिटॉक्सिफाय
चांदीच्या ग्लासमधील तत्व बॉडी डिटॉक्स करण्यासही मदत करतात. जर तुम्हाला किडनी-लिव्हरसंबंधी आजारांचा धोका कमी करायचा असेल तर चांदीच्या ग्लासमधील पाणी फायदेशीर ठरू शकतं.