सध्या थंडीचा कडाका खूपच वाढला आहे. गारेगार थंडी पडली की सकाळी लवकर उठण्याचा खूपच कंटाळा येतो. त्यातही उठून व्यायाम वगैरे करायचा असेल तर ते अगदीच जीवावर येतं. पांघरून घेऊन झोपून जावंसं वाटतं. पण या दिवसांत वजनही भराभर वाढतं. त्यामुळे वाढत्या वजनाचीही चिंता सतावत असतेच.. म्हणूनच हे काही खास व्यायाम.. ज्यांना व्यायाम करण्याचा खूप कंटाळा येतो किंवा ज्यांना इच्छा असूनही व्यायाम करता येत नाही, त्यांनी कमीतकमी वेळेत परिणामकारक व्यायाम केले तर वजन कमी होऊ शकतं. शरीर लवचिक राहू शकतं आणि फिटनेसही टिकून राहातो. असे झटपट होणारे व्यायाम नेमके कोणते ते पाहूया..(just 15 minutes exercise for fast weight loss)
वजन कमी करण्यासाठी १५ मिनिटांचे सोपे व्यायाम
पहिला व्यायाम म्हणजे तळहात एकमेकांत बांधून छातीजवळ ठेवा. यानंतर जंपिंग जॅक केल्याप्रमाणे उड्या मारा. असे ३० वेळा करा आणि त्याचे ३ सेट करा. ज्यांना उड्या मारता येत नाहीत त्यांनी एकानंतर एक याप्रमाणे पायाची हालचाल करा.
बघा काजळ लावण्याची १ ट्रिक, २४ तास काजळ राहील जसंच्या तसं! चेहरा होणार नाही काळाकुट्ट-भयाण
यामध्ये हात छातीजवळ बांधून ठेवण्यापेक्षा जर पाय लांब करताना दोन्ही हात डोक्यावर घेऊन तळहात एकमेकांना लावा आणि पाय जवळ घेताना हात लांब करा.. असं जंपिंग जॅक केल्याने हातांचाही व्यायाम होईल. हा व्यायाम केल्याने दंड, मांड्या, पोटऱ्या, कंबर यावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
हे व्यायामही करून पाहा..
१. सुर्यनमस्कार हा एक पुर्ण व्यायाम आहे. ज्यांना व्यायामासाठी पुरेसा वेळ देता येत नाही त्यांनी १० ते १५ मिनिटांचा वेळ काढून जलद गतीने सुर्यनमस्कार केल्यासही वजन कमी होण्यास मदत होते.
Vitamin B12 वाढवणारे ५ पदार्थ-रोज १ तरी खा, उदास मूड-अंगदुखी होईल गायब
२. दोरीवरच्या उड्या हा देखील एक चांगला व्यायाम आहे. त्यामुळे देखील फिटनेस टिकून राहण्यास आणि वजन कमी होण्यास बरीच मदत होते.
