Join us  

Joint pain : 52 व्या वर्षीही फिट असलेली भाग्यश्री, सांगतेय सांधेदुखी टाळण्यासाठी ४ खास एक्सरसाईज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 1:47 PM

Joint pain Exercise : व्यायामामुळे ऑस्टियोपोरोसिसग्रस्त अशा लोकांच्या वेदना कमी होऊ शकतात. 

आपल्यालाही बराच वेळ सांधेदुखी किंवा सूज येण्याची समस्या जाणवत आहे? औषधांनी देखिल काही खास परिणाम दिसत नाही, मग काळजी करू नका. फक्त औषधानंच नाही तर व्यायामामुळे आपल्याला सांध्याच्या दुखण्यामध्ये खूप आराम मिळू शकेल. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या नवीन फिटनेस व्हिडिओमध्ये चार सोपे व्यायाम सांगितले आहेत, जे आर्थराइटिसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत.

सांध्यातील जळजळ, वेदना याला आर्थस्ट्रिस म्हणतात. सांधेदुखीचे उपचार औषधं, फिजिओथेरपीद्वारे केले जातात, परंतु जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहते, वजन नियंत्रणात ठेवते किंवा नियमितपणे योग करते, तर सांधेदुखीमध्ये बरेच सुधार होते. यामुळेच भाग्यश्रीचा फिटनेस व्हिडिओ खूप चर्चेत आहे.

चिंता आणि तणावामुळे वाढू शकते सांधेदुखी

भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिवसातून तीन वेळा काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी असे म्हटले आहे की या व्यायामामुळे ऑस्टियोपोरोसिसग्रस्त अशा लोकांच्या वेदना कमी होऊ शकतात.  व्यायाम न करणं वेदना चिंता आणि तणाव वाढवू शकतात. म्हणूनच नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. 

दोन ते तीनवेळा व्यायाम करा

भाग्यश्रीने शेअर केलेले व्यायाम दिवसातून तीन वेळा केले पाहिजेत. त्याचे बरेच फायदे आहेत. दिवसातून तीन वेळा केल्या जाणार्‍या या सोप्या व्यायामामुळे सांध्यातील वेदना टाळता येतात. आपल्याला खरोखर याची आवश्यकता असल्यास, हा व्यायाम करण्यास प्रारंभ करा. भाग्यश्रीने सुचविलेले हे व्यायाम कसे करावे ते जाणून घेऊया.

व्यायाम प्रकार - १

१) सर्व प्रथम, आपल्या हाताचे तळवे सरळ ठेवा 

२) अंगठा बाजूला करा आणि नंतर वाकवा

३)  आपल्या बोटांच्या निम्म्या भागाला स्पर्श करण्यासाठी अंगठा वापरा.

४) या छोट्या व्यायामामुळे सांधेदुखीवर मात करता येते.

व्यायाम प्रकार- २

१) सगळ्यात आधी पाठीवर झोपा आणि मग हळू हळू हात वर घ्या मग खाली आणा

२) हळूहळू  खांद्याची हालचाल  करा, ही क्रिया जवळपास १० वेळा करा.

व्यायाम प्रकार- ३

१) सगळ्यात आधी पाठीवर झोपा.

२) नंतर पायांना ९० डिग्रीवर आणून पुन्हा पूर्वरत आणा 

३) जवळपास ५ वेळा हाच प्रकार करा. दिवसातून  ३ वेळी तुम्ही हीच क्रिया  करू शकता. 

व्यायाम प्रकार- 4 

१) सरळ बसून आपले पाय समोरच्या दिशेनं न्या.

२) जवळपास १ ते  ५ आकडे मोजेपर्यंत पाय तसे होल्ड करा, पाय मग खाली आणा.

३) ५ वेळा हा व्यायाम प्रकार केल्यानं सांधेदुखीपासून आराम मिळेल. 

टॅग्स :आरोग्यभाग्यश्रीहेल्थ टिप्सफिटनेस टिप्स