Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस तगडा असूनही जॉन अब्राहम भेंडी आणि वांगी खाऊ शकत नाही, त्याच्या ट्रेनरनेच सांगितलं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 18:45 IST

John Abraham cannot eat okra and brinjal, his trainer told the reason : फिटनेस असूनही जॅानला भेंडी आणि वांग पचणार नाही. कारण भलतंच.

जॉन अब्राहम हा बॉलिवूडमधील एक शिस्तबद्ध आणि फिटनेसबाबत अत्यंत जागरुक असलेला अभिनेता मानला जातो. त्याचा आहार, दिनचर्या आणि व्यायाम पद्धती याबाबत नेहमीच चर्चा होत असते. अलीकडेच सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर विनोद चन्ना यांनी एका मुलाखतीत जॉनच्या आहारशिस्तीबाबत काही मुद्दे सांगितले. ( John Abraham cannot eat okra and brinjal, his trainer told the reason)जॉन केली अनेक वर्षे कडक शिस्तबद्ध आहारच घेत आहे. त्यामध्ये तो अजिबात हयगय करत नाही, असे ट्रेनरने सांगितले. हिंदी रश या पॉडकास्ट चॅनलशी संवाद साधताना सेलिब्रिटी ट्रेनरने ही माहिती दिली. 

विनोद चन्नाने सांगितल्यानुसार, जॉन अब्राहम गेली अनेक वर्षे अत्यंत निवडक आणि नियंत्रित आहार घेत आहे. साखर, प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड आणि शरीराला अनावश्यक ताण देणारे पदार्थ तो पूर्णपणे टाळतो. जॉनचा आहार मुख्यत्वे प्रथिने आणि चांगल्या पोषणावर आधारित असून तो शरीराला जे आवश्यक आहे तेवढेच आणि तेच पदार्थ नियमितपणे खातो. यामुळे त्याचे शरीर एका ठराविक पद्धतीच्या अन्नाला सरावले आहे. त्यापेक्षा वेगळे काही त्याला आता पचणारही नाही.

याच संदर्भात बोलताना विनोद चन्ना यांनी सांगितले की जॉनच्या आहारात अनेक वर्षांपासून काही भाज्या किंवा पदार्थ नसल्यामुळे त्या अचानक खाल्ल्या तर पचनसंस्थेला ते झेपणारच नाही. भेंडी किंवा वांगी अशा भाज्या सामान्यतः पौष्टिक आणि आरोग्यासाठी चांगल्याच असतात, मात्र गेली अनेक वर्षे जॉनने त्याही खाल्या नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ आहारातून पूर्णपणे वगळलेले पदार्थ शरीराला लगेच स्वीकारणे कठीण जाऊ शकते. अशा पदार्थांचे पचन जॉनसारख्या व्यक्तीसाठी अवघड ठरु शकते. त्यामुळे तो भेंडी - वांग आता आयुष्यात परत कधीच खाऊ शकणार नाही. 

जॉन अब्राहमचा हा आहार सर्वसामान्य लोकांसाठी आदर्श म्हणून जरी पाहिला जात असला, तरी तो प्रत्येकासाठी तसाच योग्य असेलच असे नाही. जॉनची जीवनशैली, कामाचे स्वरुप आणि फिटनेसची गरज वेगळी आहे. त्यानुसार त्याचा आहार ठरतो. संतुलित आहारात सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे आणि प्रथिनांचा समावेश असणे आवश्यक असते. असेही त्याने सांगितले. 

या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे शरीर ज्या आहाराला वर्षानुवर्षे सरावलेले असते, त्यात अचानक बदल झाल्यास त्याचा परिणाम पचनावर होऊ शकतो. म्हणूनच आहारात बदल हळूहळू आणि शरीराच्या गरजेनुसार करणे महत्त्वाचे ठरते. जॉन अब्राहमचा आहार हा त्याच्या फिटनेस शिस्तीचा भाग आहे, मात्र प्रत्येकाने आपला आहार स्वत:च्या शरीराच्या प्रकृतीनुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवावा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Despite fitness, John Abraham avoids okra and eggplant: Trainer reveals why.

Web Summary : John Abraham, known for his strict fitness regime, avoids okra and eggplant due to his long-term dietary habits. His trainer revealed that introducing these foods now could upset his digestive system. He maintains a controlled diet focused on protein and essential nutrients.
टॅग्स :जॉन अब्राहमहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सआहार योजना