Japenese Health Tips : जपानमधील लोकांना पाहून त्यांचं नेमकं वय ओळखणे जवळजवळ अशक्यच वाटतं. तिथे 60 वर्षांचा माणूस देखील 40 चा दिसतो आणि 90 वर्षांचे आजोबा-दाजी सुद्धा धावतानाच दिसतात. आपण विचार करतो की कदाचित ते कोणती तरी महागडी अँटी-एजिंग क्रीम वापरत असतील… पण डॉक्टर तरंग कृष्णा यांनी त्यांच्या तरूणपणाच्या या रहस्याचा खुलासा केला आहे आणि जो थक्क करणारा आहे.
सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही की त्यांच्या दीर्घायुष्याचं आणि तरूण दिसण्याचं रहस्य ते काय खातात यात नाही, तर कसे खातात या एका जुन्या, पण जगाने विसरलेल्या नियमात दडलेले आहे.
जपानचा प्राचीन नियम - 'हारा हाची बू'
हे नाव जादू-मंत्रासारखं वाटू शकतं, पण याचा अर्थ अतिशय साधा आणि खोल आहे. 'पोट फक्त 80% भरायचे'. आपण भारतीय बहुतेक वेळा पोट पूर्ण भरेपर्यंत किंवा"बस आता एक घासही नाही" अशी वेळ येईपर्यंत खातो. परंतु जपानमधील ओकिनावा येथील लोक भूक शमली की लगेच जेवण थांबवतात. ते कधीही पोट पूर्ण भरून खात नाहीत.
हे शरीरावर कसे काम करते?
विज्ञान सांगतं की, पोटातून ‘मी भरलो आहे’ हा सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचायला 20 मिनिटं लागतात. म्हणजे तुम्ही 100% पोटभर खाल्ले असेल तर तुम्ही प्रत्यक्षात आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षा 20% जास्त खाल्लेलं असतं. यामुळे ओव्हरईटिंग, वजन वाढणे, सुस्ती, पचनाच्या समस्या या सगळ्यांचा धोका वाढतो. पण जेव्हा आपण पोट थोडं रिकामं ठेवतो, तेव्हा पचनसंस्थेवर ताण कमी होतो, शरीर हलकं वाटतं, मेटाबॉलिझम चांगलं राहतं, सेल्स लवकर वृद्ध होत नाहीत.
काय फॉलो करावं?
हळूहळू खा
जेवण चांगलं चावून खा. त्यामुळे मेंदूला सिग्नल पाठवण्यासाठी वेळ मिळतो आणि आपण नैसर्गिकरीत्या कमी खातो.
छोटी प्लेट वापरा
मनोवैज्ञानिकदृष्ट्या छोटं ताट अधिक भरलेलं असं वाटतं आणि तुम्ही कमी खाता.
थोडं कमी खा
भूक मिटली आहे, पण अजूनही थोडी जागा वाटते. अशात जेवण थांबवा.
हेही लक्षात ठेवा
खाणे म्हणजे फक्त जिभेचा आनंद नाही ते शरीराचे इंधन आहे.
जपानी लोकांचा हा छोटासा नियम आपलं वजन कमी करणे, पचन सुधारणा, ऊर्जा वाढ, दीर्घायुष्य यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
