Join us

वर्क फ्रॉम होम तुम्हाला आळशी आणि लठ्ठ तर करत नाहीये? ६ टिप्स, वजन वाढीचा धोका टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 15:21 IST

Work From Home वर्क फ्रॉम होममध्ये शरीराची हालचाल कमी होतात. त्यामुळे अतिरिक्त चरबी वाढते. जर वजन कमी करायचे असेल, तर घरी काही टिप्स फॉलो करा, उपयुक्त ठरेल..

वजन वाढणे ही समस्या सध्या सामान्य बाब झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोकं विविध प्रकार करताना दिसून येतात. व्यायाम, डाएट करतात. वजन वाढणे ही गंभीर समस्या नाही. मात्र, त्यातून होणारे आजार हे गंभीर असू शकतात. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये राहणे महत्वाचे आहे. बहुतांश लोकांचं वजन हे वर्क फ्रॉम होममुळे वाढत चाललं आहे. ऑफिसमध्ये जाणाऱ्यांच्या तुलनेत घरात बसून काम करणाऱ्यांचे वजन वाढत चाललं आहे. सतत काम, शरीराची हालचाल कमी यामुळे देखील वजन वाढत चाललं आहे. जर आपल्याला देखील घरच्या घरी वजन कमी करायचे असेल, तर या काही टिप्स.

नक्की काय कराल?

वजन अधिक वाढलं असेल तर, घरी वेळ काढून योगा अथवा व्यायाम करा.

काम करत असताना दर अर्ध्या तासाने लॅपटॉप डेस्कवरून उठून थोडा वेळ चालत जा.

वेट लॉस दरम्यान, पाणी पिणे खूप महत्वाचे असते. वेळोवेळी योग्य प्रमाणावर पाणी पीत राहा. 

कॉम्प्युटर सिस्टीममधून थोड्यावेळ डोळ्यांना आराम द्या. यासह जसा वेळ मिळेल तसं थोडं व्यायाम देखील करा.

बसून बसून शरीरात जडपणा जाणवत असेल, तर लगेच शरीराची हालचाल करा. अन्यथा लठ्ठपणासोबत इतर आजार देखील उद्भवतील.

अन्न खाल्ल्यानंतर लगेच कामाजवळ बसू नका. शतपावली महतवाची आहे.

सवयी बदला

1. आहारात फायबरचा समावेश करा

फायबर युक्त आहाराचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये ताज्या भाज्या आणि ताजी फळे यांचा समावेश करू शकता, हे आहार आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

2. पाणी अधिक प्या

वजन कमी करत असताना पाणी खूप प्यावे असा सल्ला दिला जातो. पाणी प्यायल्याने भूक कमी लागते. यासह वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. घरून काम करत असताना पाणी जास्त प्या. अन्यथा, लठ्ठपणा वाढू शकतो. याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याचे सेवन करा. ही पद्धत अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरू शकते.

3. फास्ट फूडला करा बाय - बाय

वर्क फ्रॉम होमच्यावेळी अधिक लोकं काम करता करता फास्ट फूड जास्त खातात. ज्यामुळे अतिरिक्त चरबी वाढण्याची शक्यता निर्माण होते. फास्ट फूड खाण्यापेक्षा आपण हेल्दी स्नॅक्स खाऊ शकता. संध्याकाळची छोटी भूक सगळ्यांना लागते, ती भागवण्यासाठी फास्ट फूड खाण्यापेक्षा सूप अथवा हेल्दी फूड खा. ते तुमच्या आरोग्यासाठी तर चांगलेच आहे, पण यासह तुमचे वजनही वाढणार नाही. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य