Lokmat Sakhi >Fitness > वाढलेलं ओटीपोट आता कपड्यांमधूनही लटकले? ७ टिप्स, महिनाभरात दिसेल खूप फरक, मैत्रिणी विचारतील सिक्रेट

वाढलेलं ओटीपोट आता कपड्यांमधूनही लटकले? ७ टिप्स, महिनाभरात दिसेल खूप फरक, मैत्रिणी विचारतील सिक्रेट

Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month : पोटापेक्षा ओटीपोट सुटून लटकत आहे का? हे काही उपाय करा, पोट होईल झटपट कमी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 08:35 IST2025-03-19T08:33:10+5:302025-03-19T08:35:01+5:30

Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month : पोटापेक्षा ओटीपोट सुटून लटकत आहे का? हे काही उपाय करा, पोट होईल झटपट कमी.

Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month | वाढलेलं ओटीपोट आता कपड्यांमधूनही लटकले? ७ टिप्स, महिनाभरात दिसेल खूप फरक, मैत्रिणी विचारतील सिक्रेट

वाढलेलं ओटीपोट आता कपड्यांमधूनही लटकले? ७ टिप्स, महिनाभरात दिसेल खूप फरक, मैत्रिणी विचारतील सिक्रेट

लॉकडाऊनपासून अनेक शारीरिक समस्यांमध्ये भर पडली आहे. अनेकांना श्वास घेताना दम लागतो तर, काहींची प्रतिकार क्षमता कमी झाली आहे. (Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month)मात्र एक त्रास असा झाला आहे, जो लॉकडाऊन आधीही होता. पण वर्षभर घरात बसून राहिल्याने तो वाढला. हा त्रास म्हणजे ओबेसिटी. (Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month)अनेकांच्या शरीराची स्थुलता वाढतचं चालली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले तरी, अनेकदा वजन कमी होत नाही. ते कमी करण्याच्या नादात आपण स्वास्थ्य बिघडवून घेतो. 

काही जणांचे अंग बाकी बरोबर असते मात्र, त्यांचे पोट नाही तर ओटीपोट सुटलेले असते. मायोक्लिनिकच्या पेजवर सांगितल्यानुसार, हा प्रॉब्लेम खास करुन महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. (Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month)ओटीपोट सुटण्यामागे अनेक कारणे असतात. वाढलेले ओटीपोट आपल्याला जड जाणवत राहते. दिसायलाही फार वाईट दिसते. हे वाढलेले ओटीपोट कमी करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा.   

१. ओटीपोट वाढण्याचे प्रमाण पीसीओडी, पिसीओएस असणार्‍या महिलांमध्ये जास्त आहे. ते कमी करायलाही जास्त कष्ट लागतात. ज्यांना असा त्रास असेल. त्यांनी डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणतेही उपाय करू नयेत. 

२. ज्या महिलांना इतर काही त्रास नाहीत, त्यांनी काही साधे उपाय करून बघा. महिन्याभरातच फरक जाणवेल. काही पदार्थ आहेत, जे ओटीपोट कमी करण्यासाठी मदत करतात.

३. मेथीचे दाणे घ्या. ते परता मग मिक्सरमधून फिरवून घ्या. ती मेथीची पूड रोज सकाळी चमचाभर खा. गरम पाण्याबरोबर घ्या. मेथी पचनसंस्थेचे काम सुरळीत ठेवते. तसेच जास्तीची चरबी कमी करते.

४. दालचिनी शरीरातील मेटापोलिझम चांगले ठेवते. दालचिनी पाण्यामध्ये उकळून घ्या. ते पाणी रिकाम्यापोटी प्या. दालचिनीमध्ये अनेक गुणधर्म असतात. जे पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात.  

५. सफरचंद खात जा. सफरचंदामध्ये फायबर असतात. सफरचंदामध्ये असलेले पेकटीन क्रेविंग्ज कमी करतात. तसफरचंदामुळे पोटाला आधारही मिळतो.

६. रोज कमीत कमी ३० मिनिटे तरी व्यायाम करा. पोटावर जोर पडेल अशी आसने करा. पोटाची चरबी झटपट कमी होईल.

७. वर्जासनामध्ये बसत जा. जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ बसा. शरीराची लवचिकताही वाढते आणि ओटीपोटावर ताणही येतो.   

Web Title: Is your lower belly now hanging through your clothes? 7 tips, you will see a big difference in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.