Runners Face Syndrome : आजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच लोक आपल्या फिटनेसबाबत चिंतेत असतात. Gen Z जनरेशनमध्ये फिटनेसबाबतची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येकालाच आपली तब्येत, फिटनेस आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असतं. फिटनेससाठी लोक जॉगिंग किंवा रनिंग करण्याला प्राधान्य देतात. धावण्याचे आणि चालण्याचे शरीराला भरपूर फायदे मिळतात, पण आपल्याला हे माहीत नसेल की, जास्त धावण्याचे काही नुकसानही आहेत. जास्त धावल्याने आपला चेहरा प्रभावित होऊन लवकर म्हातारा दिसू शकतो. काही रिपोर्ट्स आणि रिसर्चनुसार, जास्त वेळ आणि अधिक वेगाने धावणारे लोक ‘रनर्स फेस सिंड्रोम’ चे शिकार होऊ शकतात.
काय रनर्स फेस सिंड्रोम?
आजकाल अनेक लोकांमध्ये रनर्स फेस सिंड्रोम आढळून येत आहे. सतत धावल्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त ताण येतो आणि हळूहळू त्वचा सैल पडू लागते. यामुळे कमी वयातच किंवा वेळेआधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. संशोधनानुसार, सतत रनिंग केल्याने चेहऱ्याच्या स्नायूंवर जास्त दबाव येतो, तसेच फॅट लॉस लवकर होतो. यामुळे चेहरा लवकर वृद्ध दिसू लागतो.
या सिंड्रोमची लक्षणे कोणती?
या समस्येची लक्षणे सुरुवातीला खूप साधी वाटतात, त्यामुळे अनेकांना वाटते की हा फक्त थकव्याचा परिणाम आहे. पण काही काळानंतर खालील लक्षणे दिसू लागतात.
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे
गाल आत ओढल्यासारखे दिसणे
डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे किंवा रेषा
ओठांच्या आजूबाजूला रेषा पडणे
ही लक्षणे खासकरून जे लोक खूप वेगाने आणि दीर्घकाळ रनिंग किंवा जॉगिंग करतात, तसेच त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत, त्यांच्यात जास्त दिसून येतात.
