Join us

वजन लवकर कमी करण्यासाठी उपाशीपोटी व्यायाम करता? डॉक्टर सांगतात, चुकतंय तुमचं कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:16 IST

Empty Stomach Exercise : उपाशीपोटी व्यायाम केला तर त्यांचं वजन वेगानं कमी होईल. पण असं करणं खरंच योग्य असतं का? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

Empty Stomach Exercise : फिट आणि निरोगी राहण्यासाठी लोकांमध्ये व्यायामाचा कल अधिक वाढलेला दिसत आहे. महिला असो वा पुरूष वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. कुणी धावायला जातं, कुणी चालायला जातं तर कुणी जिमला जातं. बरेच लोक तर घरीच योगा करून फिट राहतात. बरेच लोक सकाळी उपाशीपोटी व्यायाम करतात. यामागे त्यांचा असा विचार असतो की, उपाशीपोटी व्यायाम केला तर त्यांचं वजन वेगानं कमी होईल. पण असं करणं खरंच योग्य असतं का? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.  

डॉ. मीनाक्षी फुलारा यांनी indiatv.in ला सांगितलं की, उपाशीपोटी व्यायाम करण्याचे फायदे आणि नुकसान दोन्हीही आहेत. 

वजन कमी करण्यात फायदेशीर

जेव्हा आपण उपाशीपोटी व्यायाम करतो, तेव्हा आपलं शरीर ऊर्जेसाठी फॅटचा वापर करतं. ज्यामुळे फॅट कमी होतं आणि वजन कमी होऊ शकतं. खासकरून जर लठ्ठपणा अधिक असेल तर याचा फायदा अधिक मिळतो.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसच्या रूग्णांसाठी देखील उपाशीपोटी व्यायाम करणं फायदेशीर ठरू शकतं. कारण यामुळे इन्सुलिन रेजिस्टेन्स वाढू शकते.

उपाशीपोटी व्यायामाचे नुकसान

उपाशीपोटी व्यायाम केल्यानं शरीर केवळ फॅटचाच नाही तर प्रोटीनचा देखील ऊर्जेसाठी वापर करू शकतं. ज्यामुळे काही नुकसान होऊ शकतात.

स्टॅमिना कमी होईल

उपाशीपोटी व्यायाम केल्यानं आपल्याला कमजोरी जाणवू शकते, ज्यामुळे व्यायामावर योग्यपणे लक्ष केंद्रीत करण्यास अडचण होते. अनेकदा तब्येतही बिघडू शकते.

मसल लॉस

उपाशीपोटी व्यायाम केल्यानं स्नायूंचं देखील नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे शरीराची त्वचा आणि स्नायू सैल पडू शकतात.

हाडं होतील कमजोर

उपाशीपोटी व्यायाम केल्यानं हाडं कमजोर होण्याचा देखील धोका असतो.

मेटाबॉलिज्म स्लो होतं

उपाशीपोटी व्यायाम केल्यानं आपलं मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतं. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया स्लो होऊ शकते. 

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टर सल्ला देतात की, व्यायाम करण्याआधी हलकं काही खायला हवं. त्यांच्यानुसार, व्यायामाआधी हलकं पण योग्य आहार घेतला तर शरीराला ऊर्जा मिळते. उपाशीपोटी व्यायाम केल्यानं वजन कमी होतं, पण शरीरात इतर समस्या जन्म घेऊ शकतात. त्यामुळे व्यायाम करण्याआधी काहीतरी हलकं खावं.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स