Join us  

Is Eating Rice At Night Good : कोणं म्हणतं रात्री भात खाल्ल्यानं वजन वाढते? रात्रीच्यावेळी भात खाल्ल्यानं शरीराला मिळतात ५ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:56 PM

Is Eating Rice At Night Good : भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कर्बोदकांमधून मिळणार्‍या ऊर्जेने आपण आपली दैनंदिन जीवनातील कामे सहज करू शकता.  

तांदूळ (Rice) हे भारतातील लोकांचे मुख्य अन्न आहे. डाळ भात बनवायला जास्तवेळ लागत नाही आणि खायलाही मऊ, रुचकर लागणारा हा पदार्थ आहे.  काहींना तर रात्रीच्या जेवणात भात नसेल तर झोपही लागत नाही. काहींना भात आणि राजमा तर काहींना पुलाव खूप आवडतो. तांदळात कार्बोहायड्रेट्स आढळतात. (Can we eat rice at night for weight loss) यासोबतच यामध्ये प्रोटीन, फॅट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम देखील असते. (Why Is It Bad To Eat Rice At Night) असे असूनही अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की रात्री भात खावा की नाही? ( Eating rice at night is harmful to health) भात खाल्ल्यानं वजन वाढतं असं अनेकांचं मत आहे. 

रात्रीच्यावेळी भात खाण्याचे  फायदे (Should you have rice or roti for dinner)

१) भातामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कर्बोदकांमधून मिळणार्‍या ऊर्जेने आपण आपली दैनंदिन जीवनातील कामे सहज करू शकता. कार्बोहायड्रेट्स देखील शरीरासाठी त्यांचे कार्य करतात, ज्यामुळे आपण आपली सगळी कामं सहजपणे करू शकता.

अचानक ब्लड प्रेशर वाढलं तर घाबरून जाण्याआधी ४ गोष्टी करा; तब्येत सांभाळण्याचे सोपे उपाय

२) भात पोटासाठी खूप फायदेशीर आहे. उकडलेला भात सहज पचतो. यासोबतच पोटदुखी आणि अपचनाच्या समस्येवरही फायदा होतो. त्यामुळे अनेकवेळा डॉक्टरही पोटाच्या आजारात भात आणि दही खाण्याचा सल्ला देतात.

बेडशीट, पडदे धुवायला वेळ नाही? इन्फेक्शन वाढण्याआधी १ सोपी ट्रिक वापरा, बेडशीट झटपट स्वच्छ

३) तांदूळ पचनसंस्थेसाठीही खूप चांगला असतो. यामुळे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये पोषक द्रव्ये पोहोचतात आणि ते आपले कार्य सुरळीतपणे पार पाडते. तांदूळ पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच कमकुवत पचनसंस्था बरे करते. यासोबतच पचनाशी संबंधित समस्यांमध्येही याचा खूप फायदा होतो.

रात्री भात खाणं योग्य की अयोग्य

प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहेत आणि आतापर्यंत तुम्हाला भात खाण्याचे फायदे माहीत असतीलच. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रात्री भात खाल्ल्याने तुमचे कसे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल तर भाताचे सेवन करू नका. याशिवाय तुम्ही भात खात असाल तरी रात्री फक्त ब्राऊन राईस खा जेणेकरून तुम्हाला कार्ब्स ऐवजी फायबर मिळेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण आहारात जास्त प्रमाणात प्रथिने मिळवू शकता. भात सोडण्याऐवजी ब्राऊन राईस खाणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्नफिटनेस टिप्स