Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > खांदे झुकले-पाठीला आला बाक? रामदेवबाबा सांगतात १ उपाय- बिघडलेलं पोश्चर होईल नीट

खांदे झुकले-पाठीला आला बाक? रामदेवबाबा सांगतात १ उपाय- बिघडलेलं पोश्चर होईल नीट

How To Improve Your Body Posture : मेटाबॉलिझ्म मजबूत होण्यासोबत ताण-तणाव कमी होतो आणि फोकस चांगला राहतो.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 17:27 IST2026-01-09T15:32:57+5:302026-01-09T17:27:46+5:30

How To Improve Your Body Posture : मेटाबॉलिझ्म मजबूत होण्यासोबत ताण-तणाव कमी होतो आणि फोकस चांगला राहतो.  

How To Improve Your Body Posture Swami Ramdev Reveals The Easy Way | खांदे झुकले-पाठीला आला बाक? रामदेवबाबा सांगतात १ उपाय- बिघडलेलं पोश्चर होईल नीट

खांदे झुकले-पाठीला आला बाक? रामदेवबाबा सांगतात १ उपाय- बिघडलेलं पोश्चर होईल नीट

आपल्यापैकी बऱ्याच जणांचे शरीर ताठ न राहता पोश्चर बिघडल्यामुळे खराब दिसू लागतं. खुर्ची, सोफा,कारचे सीट यांवर तासनतास बसल्यामुळे कंबर आणि गुडघे दुखण्याची समस्या उद्भवते. पाठ, मान, कंबर, गुडघे दुखण्याची समस्या प्रत्येकालाच उद्भवते. ज्यामुळे शरीराचे पोश्चर बिघडते. याच उत्तर आपल्या परंपरांमध्ये लपलेले आहे. (How To Improve Your Body Posture Swami Ramdev Reveals The Easy Way)

जमिनीवर बसणं ही संपूर्ण शरीराची नॅच्युरल एलाईनमेंट आहे. ज्यामुळे पाय, कुल्हे, कोअर मसल्स मजबूत होतात. पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी होते. ज्यामुळे पचनही चांगलं राहतं. गॅस, एसिडीटीचा त्रासही उद्भवत नाही शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. डायबिटीस,हाय बीपीच्या समस्यांचा धोका टळतो. यामुळे  पुरूषांमध्ये प्रोस्टेट हेल्थ आणि महिलांमध्ये पेल्विक फ्लोर मजबूत होते. यावर उपाय म्हणून काही योगासनं रामदेव बाबांनी सांगितली आहेत.

मेटाबॉलिझ्म मजबूत होण्यासोबत ताण-तणाव कमी होतो आणि फोकस चांगला राहतो.  ज्यामुळे संपूर्ण शरीर ट्यून अप होते. हळदीचं दूध, एपल सायडर व्हिनेगर, आल्याचा चहा, दालचिनी-मध, कोमट पाणी  प्यायल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते आणि वजनही नियंत्रणात राहतं.

रामदेव बाबा यांच्यामते चुकीचे पोश्चर हे केवळ दिसायला खराब नसते तर भविष्यात पाठदुखी, कंबरदुखी यांसारख्या आजारांना निमंत्रण देते. शरीराची ठेवण  सुधारण्यासाठी आणि पाठीचा कणा मजबूत करण्यासाठी काही योगासनं करायला हवीत.

 ताडासन आणि तिरकस ताडासन हे उभं राहून करण्याचं आसन आहे. यामुळे पाठीचा कणा ताणला जातो आणि शरीराचा तोल सुधारतो. उंची वाढवण्यासाठी आणि शरीराचा वाक काढून टाकण्यासाठी हे उत्तम आसन आहे.

भुजंगासन पोटावर झोपून केले जाणारे आसन असून पाठीच्या कण्याला लवचिकता देते. जे लोक तासनतास वाकून काम करतात. त्यांच्यासाठी हे आसन वरदान मानले जाते. हे आसन पाठीच्या खालच्या भागातील ताण कमी करते आणि शरीराला नैसर्गिक स्थितीत आणण्यास मदत करते. खांदे आणि छातीचे स्नायू  उघडण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे. यामुळे खांदे झुकण्याची समस्या दूर होते.

पाठीचा कण मागच्या बाजूला झुकवल्यामुळे शरीराचा समोरचा भाग ताणला जातो ज्यामुळे पोश्चर सुधारते. 

Web Title : रामदेव बाबा के योगा टिप्स: आसन सुधारें, पीठ दर्द कम करें।

Web Summary : रामदेव बाबा ने ताड़ासन और भुजंगासन जैसे योगासनों से आसन सुधारने, रीढ़ की हड्डी मजबूत करने और पीठ दर्द कम करने का सुझाव दिया। जमीन पर बैठना और स्वस्थ आहार संपूर्ण सेहत के लिए फायदेमंद हैं।

Web Title : Ramdev Baba's yoga tips for correcting posture and back pain.

Web Summary : Ramdev Baba suggests yoga, like Tadasana and Bhujangasana, to improve posture, strengthen the spine, and alleviate back pain. Ground sitting and a healthy diet aid overall well-being.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.