आपल्यापैकी बरेच जण असे असतात जे छोट्या छोट्या गोष्टींचाही खूप विचार करत बसतात. दुसऱ्याने बोललेली एखादी लहानशी गोष्टही मनाला लावून घेतात. भलेही त्याच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच असेल. पण त्याचा भलताच अर्थ काढून ते स्वत:च्या अंगावर ओढून घेणे आणि मग त्याचा खूप दिवस विचार करत बसणे अशी सवय अनेकांना असतेच. याचा त्या लोकांच्या मनावर खूप परिणाम होतो. आतल्या आत ते कुढत बसतात. रात्री शांत झोपही येत नाही. सतत मनात कोणते ना कोणते विचार चालू असतात. अशा व्यक्ती सतत तणावामध्ये असतात. म्हणूनच अशा व्यक्तींसाठी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी एक सोपा उपाय सुचवला आहे.(How To Get Rid of Anxiety and Over Thinking?)
मनातला विचारांचा गोंधळ कमी करण्यासाठी उपाय
मनातला विचारांचा गोंधळ कसा कमी करावा यासाठी आलिया भट, करिना कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी कलेश्वर मुद्रा करण्याचा सल्ला दिला आहे. ही मुद्रा करायला सोपी असली तरी तिचे अनेक फायदे आहेत.
Diwali Shopping: लक्ष्मीपुजनासाठी समई घ्यायची? बघा मोठ्या आकाराचे लेटेस्ट डिझाईन्स- घराला येईल शोभा
सगळ्यात आधी कलेश्वर मुद्रा कशी करायची ते पाहूया. ही मुद्रा करण्यासाठी ताठ बसा. त्यानंतर दोन्ही हाताच्या अंगठ्यांची आणि मधल्या बोटाची टोके एकमेकांना जोडा. उर्वरित तिन्ही बोटे दुमडून घ्या आणि नंतर ती एकमेकांना लावा. अंगठा तुमच्या हृदयाच्या जवळ राहील अशा पद्धतीने हात ठेवा आणि डोळे मिटून ताठ बसा. सुरुवातीला ३ ते ५ मिनिटांसाठी ही मुद्रा करा. त्यानंतर हळूहळू वेळ वाढवत नेऊन तो १५ ते २० मिनिटांपर्यंत करा.
कलेश्वर मुद्रा करण्याचे फायदे
१. कलेश्वर मुद्रा नियमितपणे केल्यास मनातली अस्वस्थता कमी होऊन मन शांत राहण्यास मदत होते.
२. ज्या लोकांना एन्झायटी किंवा ओव्हर थिंकींग करण्याची सवय असते, त्या लाेकांनी कलेश्वर मुद्रा नियमितपणे करायला हवी.
घरभर झुरळं पळताना दिसतात? आठवड्यातून एकदा 'हे' पाणी शिंपडा- घरात झुरळं होणार नाहीत
३. रात्री शांत झोप येण्यासाठीही कलेश्वर मुद्रा उपयोगी ठरते.
४. सकारात्मकता आणि एकाग्रता वाढविण्यासाठीही कलेश्वर मुद्रा उपयोगी ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडूनही ती नियमितपणे करून घ्यावी.