lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > एका आठवड्यात- एक महिन्यात खरंच झटपट वजन कमी होतं का? किती होतं? तज्ज्ञ सांगतात..

एका आठवड्यात- एक महिन्यात खरंच झटपट वजन कमी होतं का? किती होतं? तज्ज्ञ सांगतात..

How Much Weight Can You Lose in a Month : वजन कमी करण्याच्या प्रवासात खरा वेटलॉस कधी सुरु होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2024 02:04 PM2024-04-05T14:04:36+5:302024-04-05T14:05:34+5:30

How Much Weight Can You Lose in a Month : वजन कमी करण्याच्या प्रवासात खरा वेटलॉस कधी सुरु होतो?

How Much Weight Can You Lose in a Month? | एका आठवड्यात- एक महिन्यात खरंच झटपट वजन कमी होतं का? किती होतं? तज्ज्ञ सांगतात..

एका आठवड्यात- एक महिन्यात खरंच झटपट वजन कमी होतं का? किती होतं? तज्ज्ञ सांगतात..

जर आपण वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर, आपल्या मनात हमखास आपले वजन किती महिन्यात घटेल, असा विचार आला असेल (Weight Loss). सध्या प्रत्येक जण वेट लॉसला टार्गेट म्हणून बघत आहेत (Fitness). आपलं वजन महिनाभरात कमी व्हावे असे प्रत्येकाला वाटते. पण वेट लॉसला देखील वेळ लागतो. काही लोकांना इन्स्टंट रिझल्ट हवे असते. म्हणून रसायनयुक्त उत्पादनांचे सेवन करून वजन घटवण्याच्या प्रयत्न करतात.

पण बऱ्याचदा यामुळे वजन कमी होत नसून, याचा दुष्परिणाम शरीराला सहन करावे लागतात. पण जर आपण वजन कमी करण्यासाठी किती वेळ लागतो? याचे उत्तर शोधत असाल तर, याचे उत्तर दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ सना गिल यांनी दिलं आहे(How Much Weight Can You Lose in a Month).

एका आठवड्यात अर्धा किंवा एक किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, 'हळूहळू वजन कमी करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. योग्य आहार आणि व्यायाम केल्याने आठवडाभरात अर्धा किंवा १ किलोपर्यंत वजन कमी होऊ शकते. वजन कमी केल्याने रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते.'

करिना कपूरला आवडते स्पेशल दाल तडका, पाहा फोडणी घालण्याची तिची अनोखी पद्धत

याबाबत आहारतज्ज्ञ सना गिल सांगतात, 'वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये पहिल्या ३ आठवड्यात शरीरात फरक दिसून येतो. ४ ते ५ किलो वजन कमी करण्यासाठी आपल्याला १ ते २ महिने लागू शकतात. वेट लॉससाठी किती वेळ लागतो, किंवा किती महिने जातात, हे आपल्या आहार, व्यायाम आणि दिनचर्यावर अवलंबून आहे.'

कॅलरीजचे सेवन कमी करा

वेट लॉस दरम्यान, कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खायला हवे. पुरुषांनी दिवसाला सुमारे २ ते ३ हजार कॅलरीजयुक्त पदार्थ खायला हवे. तर महिलांनी दिवसाला १८०० ते २४०० कॅलरीज घ्याव्यात. किंवा याहून कमी कॅलरीजयुक्त पदार्थ खाल्ले तर, नक्कीच वेट लॉससाठी मदत होईल.

वेट लॉससाठी आहारात करा काही बदल

- आहारातून प्रोसेस्ड फूड वगळा.

- सायंकाळी अधिक कॅलरीजयुक्त पदार्थ खाऊ नका. रात्री हलके पदार्थ खा. जे सहज पचतील.

तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल

- अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने २०१७ साली केलेल्या अभ्यासानुसार, वेट लॉस करताना धान्य आणि कडधान्य खा. यामुळे चयापचयाची गती वाढेल आणि वजन कमी होईल.

- वेट लॉस करताना आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे चयापचय गती वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

- रात्री वेळेत जेवण करा. उशिरा जेवल्याने रक्तातील साखरेची पातळी बिघडते ज्यामुळे कॅलरीज व्यवस्थित बर्न होत नाही. म्हणून डिनर ७ ते ८ वाजेच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा.

Web Title: How Much Weight Can You Lose in a Month?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.