Join us
Daily Top 2Weekly Top 5

लोकं म्हणतात रोज वॉक करा; पण किती आणि कधी चाललं तर वजन होतं झरझर कमी, वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:18 IST

How Many Steps Should Walk in Morning : जर तुम्हाला सकाळी अजिबातच वेळ मिळत नसेल तर संध्याकाळीसुद्धा चालायला जाऊ शकता.

हृदय (Heart) हा आपल्या शरीरातील महत्वपूर्ण अवयव आहे. हृदयाद्वारे शरीराच्या सर्व अवयवांमध्ये ऑक्सिजन पुरवण्यास मदत होते. एका निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणं खूप महत्वाचे आहे. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे तब्येतीच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. ((How Many Steps Should Walk in Morning To Healthy Heart And Control Obesity And High BP)

अशा स्थितीत जर तुम्हाला हृदयाच्या आजारांपासून दूर राहायचे असेल तर तर तुम्ही रोज सकाळी उठून वॉक करू शकता. सकाळच्या वेळी जर तुम्ही फक्त ३ ते ४ हजार पाऊलं जरी चाललात तरी शरीराला बरेच फायदे मिळतील. जर तुम्हाला सकाळी अजिबातच वेळ मिळत नसेल तर संध्याकाळीसुद्धा चालायला जाऊ शकता.

डॉक्टर नेहमी सागंतात की सकाळच्यावेळी वॉक करायला हवं. सकाळी वॉक केल्यानं फक्त वजन कमी होत नाही तर हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. हिवाळ्याच्या दिवसांत वॉक करायलाच हवं. कारण यामुळे ब्लड प्रेशर आणि बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोल राहण्यास मदत होते. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका टाळता येतो. पाय, ग्लुट्सच्या मांसपेशी मजबूत होतात. हाडं मजबूत होतात ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो. चालण्यामुळे ताण-तणाव कमी होतो. झोप चांगली राहते. याशिवाय शरीर एक्टीव्हही राहते.

एका दिवसाला किती चालायचं?

आपलं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी तसंच हृदय मजबूत ठेवण्यासाठी दिवसाला १० हजार पाऊलं चाला. सकाळच्या वेळी एक तास ब्रिस्क वॉक, तीन चे चार हजार पाऊलं चालू शकता. ५ ते ६ हजार स्टेप्स दिवसभरात पूर्ण करा.

१० हजार स्टेप्स कशा पूर्ण कराल?

जवळपास कुठे जायचं असेल तर वाहनानं जाण्याऐवजी चालत जा. लिफ्टऐवजी शिड्या वापरा, घरातली कामं जसं की झाडू काढणं, लादी पुसणं, कपडे धुणं हे स्वत: करा. ऑफिसमध्ये लंच ब्रेकदरम्यान रोज वॉक करा. जर घरात पाळीव प्राणी असतील तर रोज वॉक करायला घेऊन जा.

English
हिंदी सारांश
Web Title : Walk daily for weight loss and a healthy heart!

Web Summary : Walking, especially in the morning, benefits heart health, controls blood pressure and cholesterol, and strengthens bones. Aim for 10,000 steps daily, incorporating walking into daily activities. This improves overall health and reduces stress.
टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स