>फिटनेस > खूप मेहनत करून वजन तर घटवलं, आता पुढे? रुटीन सांभाळा, वजनवाढ टाळा 

खूप मेहनत करून वजन तर घटवलं, आता पुढे? रुटीन सांभाळा, वजनवाढ टाळा 

Weight loss: मनासारखा वेटलॉस झाल्यामुळे एकदम खुश होऊ नका..... तब्येतीत झालेला हा बदल असाच मेंटेन ठेवायचा असेल, तर काही पथ्ये पाळा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:59 PM2021-12-07T19:59:30+5:302021-12-07T20:00:24+5:30

Weight loss: मनासारखा वेटलॉस झाल्यामुळे एकदम खुश होऊ नका..... तब्येतीत झालेला हा बदल असाच मेंटेन ठेवायचा असेल, तर काही पथ्ये पाळा....

How to follow your routine after weight loss? | खूप मेहनत करून वजन तर घटवलं, आता पुढे? रुटीन सांभाळा, वजनवाढ टाळा 

खूप मेहनत करून वजन तर घटवलं, आता पुढे? रुटीन सांभाळा, वजनवाढ टाळा 

Next
Highlightsआपण किती मोठा वेटलॉस करू शकलो, या आनंदात तुम्ही असाल, तर वेळीच सावध व्हा. कमी झालेलं तुमचं वजन पुन्हा वेगाने बाऊन्स बॅक करत वाढू शकतं.

वजन भराभर वाढतं... मात्र वेटलॉस करताना पुरती दमछाक होऊन जाते. एकेक इंच वजन उतरविण्यासाठी कसा आणि किती व्यायाम (exercise/ workout) करावा लागतो, हे वेटलॉस करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती. बरं वजन कमी करण्यासाठी त्या व्यक्तींनी केवळ व्यायामच केलेला नसतो. तर तोंडावर, जिभेवरही मोठा कंट्रोल ठेवलेला असतो. खूप महिन्यांपासून नियमितपणे डाएट आणि रेग्युलर वर्कआऊट असं रुटीन पाळून जेव्हा आपण खरोखरंच आपल्याला अपेक्षित असणाऱ्या स्टेजवर येतो, तेव्हा तो आनंद अतिशय सकारात्मक असतो.

 

तुमचंही असंच झालं असेल आणि आपण किती मोठा वेटलॉस करू शकलो, या आनंदात तुम्ही असाल, तर वेळीच सावध व्हा. कारण हाच तर एक महत्त्वाचा पॉईंट असतो, ज्यावेळी कमी झालेलं तुमचं वजन पुन्हा वेगाने बाऊन्स बॅक करत वाढू शकतं. कारण वजन अपेक्षेनुसार कमी झालं आहे, असं स्वत:ला समजावून सांगत आपण अनेक बाबतीत एकदम रिलॅक्स होऊन जातो. नेमकं इथेच चुकतं आणि वजनाचा काटा पुन्हा भराभर उजवीकडे धावायला लागतो. म्हणून जेव्हा भरपूर वेटलॉस करून तुम्ही या पॉईंटला येता तेव्हा या काही गोष्टी फॉलो करा...

या गोष्टींची काळजी घ्या....
१. खाण्यावर कंट्रोल ठेवा..
control your diet

आताच कुठे आपण वजन कमी केलं आहे, ते एवढ्यात कसं वाढणार असं वाटून जर जिभेवरचा ताबा सोडाल, तर पस्तवाल... म्हणूनच वजन कमी केल्यानंतर सगळ्यात आधी जिभेवर कंट्रोल ठेवा. वेटलॉसमध्ये जो डाएट फॉलो करायचात, तोच डाएट वेटलाॅसनंतरही तसाच चालू ठेवा.

 

२. व्यायाम विसरू नका
don't forget regular workout

वेटलॉस झाला आहे म्हटल्यावर साहजिकच आपण आपल्या व्यायामाबाबत थोडं निष्काळजी होतो. पण हाच पॉईंट आहे, जिथे मनावर ताबा ठेवा. कितीही कंटाळा आला तरी व्यायामाचं रुटीन मात्र अजिबात सोडू नका.

 

३. वजन वारंवार चेक करा
check your weight regularly

वजनाचा काटा तुमच्या जवळ नेहमीच ठेवा. आठवड्याचा एका दिवस ठरवून घ्या आणि त्या दिवशी न चुकता वजन करा. वजनात होणारे सुक्ष्म चढ उतारही व्यवस्थित टिपून ठेवा. जेणेकरून आपलं रुटीन चुकतंच की बरोबर मार्गाने जात आह हे लक्षात येईल. 

 

Web Title: How to follow your routine after weight loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

रात्री झोपण्याआधी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही - Marathi News | What Not To Eat Before Sleep : What not to eat before sleep foods to avoid in night before going to bed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्याआधी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

What Not To Eat Before Sleep : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण सर्वांनी रात्रीचे जेवण हलके ठेवावे जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल. ...

Underwear Hygien : आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम - Marathi News | Underwear Hygien: Unhygienic Underwear Causes Women To Get Serious Illnesses, Remember 5 Rules Of Laundry | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आतल्या कपड्यांच्या अस्वच्छतेमुळे महिलांना होतात गंभीर आजार, लक्षात ठेवा कपडे धुण्याचे 5 नियम

Tips For Washing Undergarments : उत्तम आरोग्य आणि स्वच्छता यांसाठी काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी, आतले कपडे धुताना न चुकता लक्षात ठेवा या गोष्टी ...

सकाळ- संध्याकाळ भरपूर दूध प्यायल्यानेही मुलं होत आहेत ॲनिमिक.. वाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Expert says excessive milk intake can be the major cause of anemia in children | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळ- संध्याकाळ भरपूर दूध प्यायल्यानेही मुलं होत आहेत ॲनिमिक.. वाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

Reasons for anemia in children: शक्ती यावी म्हणून मुलांना सकाळ- संध्याकाळ ग्लास- ग्लास दूध (glass of milk) प्यायला देत असाल तर सावधान... वाचा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत.. ...

उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात - Marathi News | eating too much fruits daily for detox for weight loss or fasting, is it good or bad? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवास किंवा डाएट म्हणून फक्त फळंच खात असाल तर... अतिरेक पडेल महागात

फळं खाण्याची योग्य रीतच अनेकांना माहित नसते केवळ भरपूर फळं खा असा प्रचार होतो आणि त्याला ते बळी पडतात.. ...

अंकिता कोवरला आवडणारं उष्ट्रासन नेमकं करतात कसं? पाहा या आसनाचे 5 जबरदस्त फायदे - Marathi News | How exactly do Ankita Kovar's favorite Ustrasana? Let's see the 5 tremendous benefits of this seat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंकिता कोवरला आवडणारं उष्ट्रासन नेमकं करतात कसं? पाहा या आसनाचे 5 जबरदस्त फायदे

हे आसन दिसायला सोपे वाटत असले तरी करायला म्हणावे तितके सोपे नाही. पाहूयात या आसनाचे शरीराला असणारे विविध फायदे कोणते ...

उष्ण असते म्हणून पपई उन्हाळ्यात खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात पपई खावी की नाही? - Marathi News | Health Tips For Summer: Is it good to eat papaya in hot summer season?  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्ण असते म्हणून पपई उन्हाळ्यात खाणं योग्य की अयोग्य? उन्हाळ्यात पपई खावी की नाही?

Eating papaya in summer: पपई हे उष्ण प्रकृतीचं फळ. त्यामुळे उन्हाळ्यात पपई खावी की नाही अनेक जणांना समजत नाही.. त्याविषयीचीच ही सविस्तर माहिती. ...