Join us

सपाट पोट हवं, पण डाएट करत नाही? १ महिना गरम पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या; झरझर घटेल वजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 18:50 IST

How Can Reduce Belly Fat Quickly Drinks : आजकाल वाढतं वजन आणि खराब लाईफस्टाईलमुळे पोटाची चरबी वाढत जाते ज्याच्या शरीराच्या संपूर्ण फिटनेसवर परिणाम होतो.

पोटाची चरबी कमी न होणं ही एक सामान्य समस्या आहे (Belly Fat Loss) . आजकाल बरेच लोक या समस्येनं त्रस्त आहे अनेकांना थुलथुलित पोट आवडत नाही. प्रत्येकालाच असं वाटतं की आपण फिट, मेंटेन दिसावं. आजकाल वाढतं वजन आणि खराब लाईफस्टाईलमुळे पोटाची चरबी वाढत जाते ज्याच्या शरीराच्या संपूर्ण फिटनेसवर परिणाम होतो. पण नियमित तुम्ही काही घरगुती उपाय केले तर पोटाची चरबी कमी  करू शकता. (How Can Reduce Belly Fat Quickly Drinks)

गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून पिण्याचे फायदे

सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. हा उपाय तुमच्या शरीसाठी फायदेशीर ठरेल. लिंबात व्हिटामीन सी, एंटीऑक्सिडेंट्स आणि एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते आणि चरबी कमी होते. लिंबातील एसिडीक गुण शरीराचे मेटाबॉलिझ्म वाढवतात ज्यामुळे कॅलरीज जळण्याची प्रक्रिया वेगानं होते. पचनक्रिया चांगली होण्यासही मदत होते. पोटाची चरबी कमी होते. 

व्हिटामीन, प्रोटीनचा पॉवरहाऊस आहेत शेवग्याच्या शेंगा; आठवड्यातून एकदा खा, हाडं बळकट होतील

मधाचे फायदे

मध एक नैसर्गिक स्विनर आहे ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मधात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते जे शरीरात उर्जेचा संचार वाढवते आणि दिवसभर एक्टिव्ह राहण्यास  मदत होते. ज्यामुळे भूक कंट्रोल होते  ज्यामुळे तुम्ही जास्त खात नाही. मधात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करता आणि चरबी कमी होण्यास मदत होते. 

गरम पाणी पिण्याचे फायदे

गरम पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिज्म वाढतो आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. गरम पाण्याच्या सेवनानं शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.

थंडीत त्वचा काळवंडली-कोरडी पडली? चमचाभर हिरवी मुगाची डाळ 'या' पद्धतीनं लावा; चेहऱ्यावर येईल तेज

एक ग्लास गरम पाणी घ्या. त्यात अर्धा लिंबाचा रस घाला नंतर एक चमचा मध घालून व्यवस्थित मिसळून घ्या. हे मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी प्या. हा उपाय करण्यासाठी खात्री करा की तुम्हाला लिंबू किंवा मधाची एलर्जी नसेल. हा उपाय केवळ तुमच्या डाएट प्लॅनचा भाग नसून यामुळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. बॅलेन्स डाएट आणि नियमित व्यायाम करणंही गरजेचं आहे. जर तुम्हाला आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या असतील तर  हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य