Lokmat Sakhi >Fitness > कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर

कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर

Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely : छान सुडौल कंबर हवी असेल तर लक्षात ठेवा या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2025 13:27 IST2025-09-07T13:26:08+5:302025-09-07T13:27:06+5:30

Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely : छान सुडौल कंबर हवी असेल तर लक्षात ठेवा या टिप्स.

Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely | कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर

कंबरेजवळ साठलेले फॅट्स कमी करण्यासाठी लक्षात ठेवा या टिप्स - कंबर दिसेल छान सुडौल सुंदर

कंबरेजवळ म्हणजेच पोटाच्या आणि कंबरेच्या भागात चरबी साठणे ही आजकाल खूप सामान्य समस्या आहे. यामागे जीवनशैली, आहार, हार्मोन्स आणि मानसिक ताण अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पोटाभोवतीची चरबी इतर शरीराच्या भागातील चरबीपेक्षा अधिक चिवट असते. कमी करायला कठीण जाते. (Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely)पोटाभोवती फॅट्स वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे असंतुलित आहार. जास्त प्रमाणात तळलेले, तेलकट, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड खाल्ले की शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरी मिळतात आणि त्या चरबीच्या स्वरुपात कंबरेभोवती साठतात. यासोबतच शारीरिक हालचाली कमी झाल्या, बसून राहण्याची सवय वाढली तर चरबी अधिक प्रमाणात साठते. हार्मोनल बदल, विशेषतः महिलांमध्ये पोटाभोवती चरबी साठण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच ताण-तणावाच्या परिस्थितीत कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो देखील पोटाभोवती चरबी जमा होण्यासाठी कारणीभूत ठरतो.

१. ही चरबी कमी करण्यासाठी जीवनशैलीत सातत्यपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आहारावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. पोटभर खाण्याऐवजी थोडे-थोडे आणि पौष्टिक अन्न घेणे, आहारात भाजीपाला, फळे, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि पुरेशी पाणीपिण्याची सवय ठेवणे आवश्यक आहे. 

२. साखर आणि जास्त तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करणे ही पहिली पायरी असते. नियमित व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे. चालणे, धावणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा योगासारखे व्यायाम पोटाभोवती साठलेली चरबी कमी करण्यास मदत करतात. यासोबतच पोटासाठीचे विशेष व्यायाम जसे की प्लँक, क्रंचेस, लेग रेज यांचा सराव केल्यास अधिक चांगले परिणाम दिसतात.

३. फक्त आहार आणि व्यायामच नव्हे तर पुरेशी झोप आणि ताण नियंत्रणही या प्रक्रियेत महत्त्वाचे आहे. कमी झोपेमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि भूक वाढवणारे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. ज्यामुळे जास्त खाण्याकडे प्रवृत्ती वाढते. ध्यान, प्राणायाम यांसारख्या पद्धतींनी मन शांत ठेवले तर ताण कमी होतो आणि चरबी साठण्याची प्रक्रिया मंदावते.

४. रोज सकाळी धणे-जिरे पाण्यात उकळून तो काढा प्या. तसेच चहाऐवजी ब्लॅक कॉफी, तुळशीचा काढा अशी पेये प्या. हळूहळू फॅट्स कमी होतात. कंबर छान सुबक दिसावी यासाठी हे उपाय नक्की करा. 

Web Title: Health tips, remember these tips to reduce fat around the waist - your waist will look nice and shapely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.