Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी कपूर- मलायका अरोरा उपाशी पोटी रोज साजूक तूप का खातात? पारंपरिक उपायाला नवं ग्लॅमर, पाहा काय करायचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 17:05 IST

Ghee on empty stomach health benefits celebs fitness glowing skin secret : ghee on empty stomach benefits : योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्लेलं साजूक तूप शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते...

आजकाल फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाईलसाठी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या डेली रुटीनबद्दल जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता अनेकजणींमध्ये  असते. जान्हवी कपूर, मलायका अरोरा आणि क्रिती सेनन यांसारख्या अभिनेत्री आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. या बॉलिवूड अभिनेत्री स्वतःचे डेली रुटीन फॉलो करतात सोबतच आपला फिटनेस, केस, त्वचा एकूणच संपूर्ण आरोग्याची काळजी घेताना दिसतात. या अभिनेत्री केवळ वर्कआउटवरच नाही, तर पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांवरही भर देतात. बॉलिवूड अभिनेत्री सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी साजूक तूप खातात. पारंपरिक आयुर्वेदात साजूक तुपाला ‘अमृत’ मानले जाते(ghee on empty stomach benefits)

योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने घेतलेले तूप शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी शुद्ध साजूक तूप खाणं ही त्यांची एक महत्त्वाची सवय असल्याचं सांगितलं जातं. हा आयुर्वेदिक उपाय शरीराला आतून पोषण देतो, पचन सुधारतो आणि संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतो. खरंतर, वजन वाढेल किंवा पोट, मांड्यांवरील फॅट्सचे प्रमाण वाढेल या भीतीने आपण वेटलॉस करताना साजूक तूप खाणच सोडून देतो, परंतु याउलट मोठमोठ्या सेलिब्रिटी किंवा बॉलिवूड अभिनेत्री सकाळी उठल्यावर दिवसाची सुरुवात साजूक तूप खाऊनच करतात. सकाळी उठल्यावर साजूक (Ghee on empty stomach health benefits celebs fitness glowing skin secret) तूप खाण्याचे नेमके काय फायदे आहेत ते पाहूयात... 

साजूक तूप म्हणजे आरोग्यासाठी वरदानच... 

साजूक तूप फक्त पदार्थांची चव वाढवण्यापुरतेच नाही, तर त्यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स, जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्य आणि त्वचा दोन्हीसाठी खूप फायदेशीर ठरतात. Healthline मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, एक मोठा चमचा तुपामध्ये सुमारे १२३ कॅलरीज असतात. यामध्ये सुमारे ९ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट, ४ ग्रॅम हेल्दी फॅट आणि ०.५ ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट असते. याशिवाय, हे तूप रोजच्या गरजेपैकी सुमारे १३% व्हिटॅमिन A, ३% व्हिटॅमिन E आणि १% व्हिटॅमिन K देखील शरीराला पुरवते.

दिल्ली येथील फोर्टिस हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, डॉ. शुभम वात्स्य यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलखातीनुसार रोज सकाळी उपाशी पोटी तूप खाण्याचे फायदे सांगितले आहेत.

सकाळी उपाशी पोटी साजूक तूप खाण्याचे फायदे... 

सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा साजूक तूप खाणे ही आयुर्वेदातील एक जुनी आणि अत्यंत प्रभावी पद्धत आहे. याला 'घृत पान' असेही म्हटले जाते.

१. तूप नैसर्गिक ल्युब्रिकंटप्रमाणे काम करते. यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. हे पचनशक्ती वाढवून शरीरातील 'अग्नी' प्रज्वलित करण्यास मदत करते.

२. नियमितपणे रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे त्वचा आतून हायड्रेट होते, चेहरा तजेलदार दिसतो आणि अकाली सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते.

विकतपेक्षा चांगले आणि अस्सल मोझरेला चीज घरी करण्याची सोपी रेसिपी, पिझ्झा-पास्ता की पराठा घाला चीज मनसोक्त...

तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!

३. तूप सांध्यांमध्ये नैसर्गिक वंगण म्हणून कार्य करते. यामुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होतो आणि हाडांचे आरोग्य सुधारते. ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे वरदान ठरू शकते.

४. तुपामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे मेंदूच्या पेशींच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

५. योग्य प्रमाणात तुपाचा आहारात समावेश केल्यास वजन वाढत नाही. हे भूक नियंत्रित करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत करते.

साजूक तूप खाण्याची योग्य पद्धत... 

सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाण्यासोबत १ छोटा चमचा साजूक तूप खावे. तूप खाल्ल्यानंतर किमान ३० ते ४५ मिनिटे काहीही खाऊ नये, जेणेकरून शरीराला ते शोषून घेण्यास वेळ मिळेल. आपण साजूक तूप गरम डाळ, भात किंवा चपातीला लावून देखील खाऊ शकता. तूप कधीही खूप थंड किंवा तळलेल, जास्त गरम केलेल्या स्वरूपात खाऊ नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Janhvi Kapoor and Malaika Arora's Ghee Secret: Glowing Skin & Health!

Web Summary : Janhvi Kapoor, Malaika Arora start their day with ghee for health benefits. This Ayurvedic practice aids digestion, hydrates skin, strengthens bones and enhances memory. Ghee is a boon for overall health.
टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी