Join us
Daily Top 2Weekly Top 5

फिट राहण्यासाठी फिटनेस ट्रेनरने सांगितली एक सोपी फिटनेस हॅक, फॉलो कराल तर होईल फायदाच फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:18 IST

Fitness Hack : अलिकडेच सोशल मीडियावर चेन्नईमधील फिटनेस ट्रेनरने एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात तिने काही फिटनेस हॅक सांगितले आहेत.

Fitness Hack : हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, जर आपण फिटनेसबाबत हलगर्जीपणा केला, योग्य त्या वेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. कारण शरीर ही आपली सगळ्यात मोठी संपत्ती मानली जाते. जर तेच निरोगी आणि फिट नसेल तर कोणतीही कामे होऊ शकणार नाहीत. इथे लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा म्हणजे अनेकांना गैरसमज असतो की, फिट राहण्यासाठी जिममध्येच जावं लागतं. पण अजिबात काही नाहीये. घरच्या घरी हलके-फुलके व्यायाम करून, योगा करूनही आपण फिट राहू शकता. सायकलिंग, स्वीमिंग किंवा ब्रीस्क वॉकसारख्या अॅक्टिविटी आपल्याला फिट ठेवतात. अलिकडेच सोशल मीडियावर चेन्नईमधील फिटनेस ट्रेनरने एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात त्यानी एक महत्वाची फिटनेस हॅक सांगितली आहे.

काय सांगते फिटनेस ट्रेनर?

चेन्नईमध्ये राहणारे फिटनेस ट्रेनर राज गणपतकडे १८ वर्षांचा अनुभव आहे. राज यानी व्हिडिओत सांगितलं की, आपण सगळेच कोणती ना कोणती फिटनेस हॅक शोधत आहोत. फिटनेससंबंधी इतकी माहीत उपलब्ध आहे, त्यामुळे आपल्याला अशी गोष्ट हवी असते जी आपली फिटनेस सोपी करेल आणि आपल्याला वेगाने पुढे जाण्यास मदत करेल.

फिटनेसचा कानमंत्र?

राज गणपतनुसार, फिटनेस हॅक आहे डिसिप्लिन म्हणजे शिस्त. ज्या लोकांना केवळ रिझल्ट बघायला असतो आणि त्यांना रिझल्ट मिळालाय त्यांच्यात केवळ शिस्तीचा फरक असतो. फिटनेस ट्रेनर सांगतात की, शिस्त म्हणजे केवळ खेळाडूंच्या लेव्हलची शिस्त नाही. तर आपली लाइफस्टाईल संतुलित ठेवणे, हेल्दी ठेवणे. शिस्तच आपल्याला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकते. 

आपल्याला अशा सवयी रोज कायम ठेवाव्या लागतील, ज्या आपल्याला फिटनेस चांगली ठेवण्यास मदत करतात. मग त्या हेल्दी डाएटसंबंधी असतील किंवा रात्री पुरेशी झोप घेणे असेल किंवा वेगवेगळ्या अॅक्टिविटी करणं असू शकतात. राज गणपतनुसार शॉर्टकट किंवा लगेच रिझल्ट देणाऱ्या उपायांमागे धावण्यापेक्षा आपलं लक्षं शिस्तीवर केंद्रित करा. तेव्हाच आपल्याला चांगला आणि मोठा रिझल्ट मिळू शकेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Fitness trainer reveals simple hack for staying fit, get benefits.

Web Summary : Fitness isn't just gym; home workouts, yoga, cycling help. Trainer Raj Ganpath emphasizes discipline for balanced lifestyle, healthy habits, and sufficient sleep. Focus on consistency, not shortcuts, for lasting fitness results.
टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स