lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness >  टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..

 टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..

फिट राहण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करत आहात.. पण तरीही एवढे करूनही कुठेतरी कमी पडतेय असे वाटतेय का..?, तुमचे पाय तुम्हाला व्यवस्थित टोन्ड करता येत नाहीयेत का ?, असे असेल तर सुपरफिट लाईफस्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री वाणी कपूर हिने शेअर केलेले तिचे वर्कआऊट सेशन्स नक्की पहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 07:19 PM2021-07-05T19:19:02+5:302021-07-05T19:31:15+5:30

फिट राहण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करत आहात.. पण तरीही एवढे करूनही कुठेतरी कमी पडतेय असे वाटतेय का..?, तुमचे पाय तुम्हाला व्यवस्थित टोन्ड करता येत नाहीयेत का ?, असे असेल तर सुपरफिट लाईफस्टाईलसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री वाणी कपूर हिने शेअर केलेले तिचे वर्कआऊट सेशन्स नक्की पहा..

Fitness tips : Toned legs exercise by Bollywood actress Vaani Kapoor |  टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..

 टोन्ड लेग्ज हवेत, छान सुबक पाय.... वाणी कपूरचे हे वर्कआऊट व्हिडीओ पहा..

Highlightsपायांच्या व्यायामाकडे महिलांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे चाळीशीनंतर पाय, घोटे, गुडघे यांचे दुखणे उद्भवण्याचे प्रमाण कमी होते.पायांसाठी दररोज ३० मिनिटांचे वर्कआऊट करणेही पुरेसे ठरते. 

बॉलीवुड ॲक्ट्रेस वाणी कपूर तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. साेशल मिडियावर ती नेहमीच तिचे वर्कआऊट फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. तिचे फिटनेसबाबतचे व्हिडियो आणि फोटो पाहून तिच्या चाहत्यांना नक्कीच प्रेरणा मिळते. वाणीने नुकताच एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती जे वर्कआऊट करते आहे, ते खास तुमचे पाय छान, सुबक आणि आकर्षक रहावेत, यासाठी आहे. 

 

बॉडी टोन ही कन्सेप्ट बहुतेकांनी ऐकलेली आहे आणि त्याबाबत बऱ्यापैकी माहिती देखील आहे. आता बॉडी टोनप्रमाणे टोन्ड लेग्जबाबतही फिटनेसप्रेमी अलर्ट झाले आहे. यासाठी अनेक वर्कआऊट सेशन्सदेखील घेतले जातात. वाणीने शेअर केलेला व्हिडियो देखील याच संदर्भात आहे. यामध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या लेग एक्सरसाईज सांगितल्या आहेत. 

 

या व्हिडियोमध्ये वाणी कपूर आणि सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला वर्कआऊट करताना दिसत आहेत. पायांचे कोणते व्यायाम कसे आणि किती वेळेला करायचे, याबाबतही या व्हिडियोमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

टोन्ड लेग्ससाठी करा हे काही व्यायाम
१. स्क्वाट्स
२. लंज एक्सरसाइज
३. प्लैंक लेग लिफ्ट्स
४. सिंगल-लेग डेडलिफ्ट्स
५. स्टेबिलिटी बॉल टक्स
६. स्टेप-अप्स
७. बॉक्स जंप्स
 

Web Title: Fitness tips : Toned legs exercise by Bollywood actress Vaani Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.