Lokmat Sakhi >Fitness > उपवास करून आतून तरूण होतं शरीर? डॉक्टरांनी स्वत:वर केली टेस्ट; पाहा काय आला रिपोर्ट

उपवास करून आतून तरूण होतं शरीर? डॉक्टरांनी स्वत:वर केली टेस्ट; पाहा काय आला रिपोर्ट

Fasting Impact On Organs : आयुष्य कसं वाढवावं? याचं रहस्य उपवासात दडलं आहे. तेच अमेरिकेच्या मियामी शहरात राहणारे डॉक्टर रवि के. गुप्ता यांनी सांगितलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:01 IST2025-09-23T13:00:54+5:302025-09-23T13:01:41+5:30

Fasting Impact On Organs : आयुष्य कसं वाढवावं? याचं रहस्य उपवासात दडलं आहे. तेच अमेरिकेच्या मियामी शहरात राहणारे डॉक्टर रवि के. गुप्ता यांनी सांगितलं आहे.

Fasting makes you younger and increase life expectancy says doctor | उपवास करून आतून तरूण होतं शरीर? डॉक्टरांनी स्वत:वर केली टेस्ट; पाहा काय आला रिपोर्ट

उपवास करून आतून तरूण होतं शरीर? डॉक्टरांनी स्वत:वर केली टेस्ट; पाहा काय आला रिपोर्ट

Fasting Impact On Organs : सध्या नवरात्री (Navratri 2025) सुरू आहे. भरपूर लोक ९ उपवास करतात. मुळात उपवास धार्मिक भावनेतून केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, याचा शरीराला आणि शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना किती फायदा मिळतो. आज आपण उपवास (Navratri Fasting Benefits) करण्याचे हेच फायदे पाहणार आहोत. अनेकांना १०० वर्ष आयुष्य जगण्याची ईच्छा असते. आयुष्य कसं वाढवावं? याचं रहस्य उपवासात दडलं आहे. तेच अमेरिकेच्या मियामी शहरात राहणारे डॉक्टर रवि के. गुप्ता यांनी सांगितलं आहे.

डॉ. रवि गुप्ता एक हेमाटोलॉजी ऑनकोलॉजीचे एक्सपर्ट असून त्यांचं मत आहे की, उपवास म्हणजेच फास्टिंग केल्यानं तरूण बनता येऊ शकतं आणि हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:वरच टेस्ट केली. टेस्टनंतर त्यांचं बायोलॉजिकल वय कमी झालं.

काय असतं बायोलॉजिकल वय?

एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून बायोलॉजिकल वय माहीत करून घेता येऊ शकतं. या टेस्टमधून शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचं वय समजतं. हृदय, मेंदू, फुप्फुसं, टिश्यू इत्यादी कोणत्या वयानुसार काम करतात हे जाणून घेता येतं. हे कंट्रोल करून आजारांना दूर ठेवलं जाऊ शकतं. तुम्ही बाहेरून कितीही म्हातारे दिसले, तरी हृदय तरूणच राहणार.

उपवासाने कमी करू शकता वय

डॉक्टर म्हणाले की, उपवास करून वाढतं वय कमी केलं जाऊ शकतं. त्यामुळे उपवास नक्की करावे. यासाठी आपण एक दिवसाच्या उपवासापासून सुरूवात करू शकता. डॉ. रवि यांनी ३ दिवस उपवास करण्याआधी आणि नंतर बायोलॉजिकल टेस्ट केली. जाणून घेऊ उपवासाच्या आधी आणि नंतर त्यांच्या अवयवांचं वय काय होतं.

अवयवांचं आयुष्य वाढलं

डॉक्टरांनी लागोपाठ तीन दिवस उपवास केला आणि यादरम्यान केवळ पाणी आणि टूथपेस्टचा वापर केला. उपवासानंतर टेस्टचे रिपोर्ट फारच आश्चर्यकारक आले. रक्त सोडून सगळ्यात अवयवांचं वय कमी झालेलं दिसलं. फुप्फुसं तर ४ वर्षानं तरूण झालेत.

उपवास करण्याआधी बायोलॉजिकल वय

फुप्फुसांचं वय ३२.१ वर्ष, रक्ताचं वय ३५.७ वर्ष, लिव्हरचं वय ३१.१ वर्ष, हृदयाचं वय ३२.१ वर्ष, किडनीचं वय ३३ वर्ष, मेंदूचं वय ३४.४ वर्ष, त्यांचं मूळ वय २९ वर्ष.

उपवास केल्यानंतरचं बायोलॉजिकल वय

फुप्फुसांचं वय २७.९ वर्ष, रक्ताचं वय ३६.५ वर्ष, लिव्हरचं वय २९.६ वर्ष, हृदयाचं वय २९.५ वर्ष, किडनीचं वय ३०.८ वर्ष, मेंदूचं वय ३३.५ वर्ष, मूळ वय २९ वर्ष.

Web Title: Fasting makes you younger and increase life expectancy says doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.