सकाळी सगळे उठण्याच्या आधी घरातल्या महिला उठलेल्या असतात आणि त्यांच्या कामाला लागलेल्या असतात. त्यानंतर रात्री सगळे निवांत असतात पण घरातल्या महिलांची मात्र स्वयंपाक घरातली आवराआवर सुरू असते. हे सगळं दिवसभराचं कामाचं चक्र जेव्हा थांबतं तेव्हा अंथरुणावर पडल्यावर कित्येक जणींना जाणीव होते ती त्यांच्या दुखण्याची. पोटऱ्या ओढल्यासारख्या होत असतात, तळपाय आणि टाचा दुखत असतात. उठता- बसता गुडघे कुरकुरत असतात. या सगळ्यामागचं कारण म्हणजे दिवसभरात खूप वेळ त्यांनी सलग उभं राहून काम केलेलं असतं. आता कामामुळे सतत ब्रेक घेऊन बसणं, आराम करणं तर शक्य नाही (exercise to get relief from heel pain, knee pain and calf pain). म्हणूनच तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पुढे सांगितलेले काही व्यायाम करा. हे व्यायाम अगदी १० मिनिटांचेच आहेत (how to reduce heel pain, knee pain and calf pain?). त्यामुळे झटपट करून होतील आणि आराम मिळेल.(3 exercise for reducing leg pain)
टाचदुखी, गुडघेदुखी, पोटऱ्यांचं दुखणं कमी करण्यासाठी व्यायाम
वरील सगळे त्रास कमी करण्यासाठी आपण असे काही व्यायाम पाहणार आहोत, ज्यामुळे तुमच्या पायाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होईल. त्यांचं बऱ्यापैकी स्ट्रेचिंग झालं की मग आपोआपच पोटऱ्या, टाचा, गुडघे, तळपाय दुखणं कमी होईल.
पांढरे केस होतील काळे! फक्त १ चमचा काळे तीळ घेऊन करा 'हा' उपाय, केस गळणंही थांबेल
यासाठीचा सगळ्यात पहिला व्यायाम म्हणजे एकाजागी ताठ उभे राहा. यानंतर गुडघे फारसे न हलवता टाचांवर जोर देऊन पायाची बोटे हलवा आणि तळपाय उचला. म्हणजेच उजवा तळपाय उजव्या दिशेने तर डावा तळपाय डाव्या दिशेने करा. पुन्हा ते आधीसारखे समोर ठेवा. असं साधारण २० वेळा करा. आणि २० - २० चे २ सेट करा.
यानंतर ताठ उभे राहा. टाचा जमिनीवर तशाच ठेवा आणि फक्त बोटांची हालचाल करा. बोटं दुमडून घ्या आणि नंतर पुन्हा मोकळी करा. ही क्रियासुद्धा २० वेळा करा. आणि २० - २० चे २ सेट करा.
लग्नात करतात तसा खमंग, चवदार गाजर हलवा करण्याची रेसिपी- हलवाईने सांगितलेल्या खास टिप्स
तिसरा व्यायाम करण्यासाठी २ ते ३ मिनिटे टाचांवर चाला. आणि त्यानंतर पुढची २ ते ३ मिनिटे बोटांवर चाला. हे काही व्यायाम केल्याने गुडघे, पोटऱ्या, तळपाय, टाचा या सगळ्यांचाच छान व्यायाम होतो आणि दुखणं बरं होतं.
Web Summary : Standing for long hours causes leg pain. Simple exercises, like toe and heel raises, and walking on toes and heels, can provide relief from heel, knee, and calf pain. Doing these exercises regularly strengthens leg muscles and reduces pain.
Web Summary : लंबे समय तक खड़े रहने से पैरों में दर्द होता है। पैर की उंगलियों और एड़ी को ऊपर उठाने और पैर की उंगलियों और एड़ी पर चलने जैसे आसान व्यायाम एड़ी, घुटने और पिंडली के दर्द से राहत दिला सकते हैं। इन व्यायामों को नियमित रूप से करने से पैर की मांसपेशियां मजबूत होती हैं और दर्द कम होता है।