Lokmat Sakhi >Fitness > वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम

वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम

Fitness Tips In Early 30's: वय वाढल्यानंतर काही सवयी एकदम बदलून जमत नाही.. त्यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची सवय करून घ्यावी लागते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2025 17:47 IST2025-04-22T12:34:16+5:302025-04-22T17:47:47+5:30

Fitness Tips In Early 30's: वय वाढल्यानंतर काही सवयी एकदम बदलून जमत नाही.. त्यासाठी आधीपासूनच काही गोष्टींची सवय करून घ्यावी लागते...

every person must do 5 things in their early 30's for reverse aging and maintaining fitness | वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम

वयाची तिशी येताच ५ गोष्टी तातडीने बदला, तारुण्य सरणार नाही आणि फिटनेसही राहील कायम

Highlights वय वाढलं तरी तुमची तब्येत, सौंदर्य, तारुण्य, फिटनेस थोडाही कमी होणार नाही. ते बदल नेमके कोणते ते पाहा..

'पी हळद आणि हो गोरी' अशी म्हण आपल्याकडे आहेच. बऱ्याच जणांचं वागणंही याच सवयीनुसार असतं.. उदाहरणार्थ वयाच्या चाळिशीनंतर काही ना काही त्रास सुरु होतात. ते त्रास जोपर्यंत सहन होण्यासारखे असतात तोपर्यंत आपण ते त्रास सहन करतो. आणि जेव्हा असह्य होतं तेव्हा मग डाॅक्टरांचा सल्ला घेण्याचा किंवा मग आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा विचार करू लागतो. पण तोपर्यंत ते त्रास खूप वाढलेले असतात. शरीरावर त्याचा व्हायचा तो परिणामही झालेला असतो. म्हणूनच तज्ज्ञ असं सांगतात की अगदी सुरुवातीपासूनच म्हणजेच वयाची तिशी गाठल्यापासूनच तुमच्या जीवनशैलीमध्ये, आहारामध्ये काही बदल केले पाहिजेत. जेणेकरून वय वाढलं तरी तुमची तब्येत, सौंदर्य, तारुण्य, फिटनेस थोडाही कमी होणार नाही. ते बदल नेमके कोणते ते पाहा..(every person must do 5 things in their early 30's for reverse aging and maintaining fitness)

 

वयाची तिशी येताच कोणत्या गोष्टी आवर्जून करायला हव्या?

नुकतीच तिशी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी iduna_eternalhealth या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे...

ठुशी मंगळसूत्राचे १० अतिशय देखणे डिझाईन्स, ठुशी नेहमीच घालता आता ठुशीचे मंगळसूत्र ट्राय करा..

१. या वयात तुमच्या शरीराला प्रोटीन्सची आणि तुमच्या मेंदूला ओमेगा २, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम यांची गरज असते. या गोष्टींची शरीरात कमतरता असेल तर तुम्ही खूप लवकर थकून जाता. एन्झायटी, ताण आणि विसराळूपणाही यामुळे वाढत जातो. म्हणूनच या घटकांचे आहारातले प्रमाण वाढवा.

उन्हाळ्यात नाश्त्याला करून खायलाच हवेत दह्यातले पाेहे! पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

२. सध्या प्रत्येकालाच खूप ताण आहे. कामाचे प्रेशर आहे. खूप वेगवेगळे आकर्षणं आहेत. या सगळ्या धकाधकीमध्ये तुमचा मेंदू सतत काम करतो. त्याला थोडी विश्रांती द्या. स्क्रिन टाईम कमी करा. मेडिटेशन करा. काही वेळ शांततेत, एकांतात नुसते बसून राहा.

 

३. यावयात इस्ट्रोजीन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्याचा आरोग्यावर परिणाम होतोच. त्यामुळे नियमित व्यायाम करायला विसरू नका.

योग अभ्यासक सांगतात रोज ३ मिनिटे मानेला मसाज करा- औषधांशिवाय अनेक आजार बरे होतील

४. या वयात मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही प्रयत्न करायला हवे. त्यासाठी मेडिटेशन, योगा, वाचन, छंद जोपासणे अशा तुमचं मन ज्यामुळे फ्रेश राहील त्या गोष्टींसाठी वेळ द्या. 

५. या वयात ऑक्सिटोसिन या हार्मोन्सचे शरीरातील प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ताण येणे, चिडचिडेपणा वाढणे, एकटं वाटणे असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच या वयात हार्मोन्सचे संतुलन जपणे गरजेचे आहे. 


 

Web Title: every person must do 5 things in their early 30's for reverse aging and maintaining fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.